स्त्री - कॉर्पोरेट मानसिकता आणि मातृत्व

स्त्री - कॉर्पोरेट मानसिकता आणि मातृत्व

शुक्रवार.... विकेंडला चिकटलेला पण तरीही वेगळा. खुनी सोमवार तू मेरा खून चूसले गाण्याप्रमाणे शुक्रवार सुद्धा मला जाम बोरिंग वाटतो. वीकेण्डला
झोपा काढायच्या कि कुठे फिरायला जायचे ह्या गोड़ स्वप्नांच्यामध्ये कडमडणारा शुक्रवारचा दिवस ऑफिसमध्ये निरर्थक वाटू लागतो....खूप झाले बाबा शुक्रवार पुराण.

तर असाच हा आजचा शुक्रवारचा दिवस आणि अशीच बोअर होणारी मी. सकाळचे ११ - ११:३० झाले असतील (देवा अजून - तास जायचे आहेत. 'नको देवराया अंत पाहू आता' उक्तीप्रमाणे माझी अवस्था) आणि 'कधी तू.....' स्वप्नील आणि मुक्ता मोबाईलमध्ये गुणगुणू लागले. कोण तडमडतंय म्हणत फोन पाहिला तर अननोन नंबर होता. कोणाचा असेल ह्या विचारात असेपर्यंत तर्जनीला स्क्रीनवरच्या हिरव्या रंगाला भेटण्याची घाई झाली होती. शेवटी फोन कानाला लागलाच. 'हॅलो' एक मंजुळ पण ऍटिट्यूड वाला स्वर..... (नाही.... मला आता एकही सेल्सकॉल एंटरटेन करायचा नाही), नशिबाने तो सेल्स नाही तर माझ्या पोटापाण्यासाठीचा फोन होता, पण त्या फोन ने माझा लेज़ी शुक्रवार विचारांत बुडवून टाकला.

“Hi, is this Preeti Desai?”
“Yeah, who is this?”
“Hiee Preeti, Saloni this side calling from HR department, XYZ company”
“Hey Hi Saloni, tell me”
“Preeti, have come across to your profile from one of the job portal. Are you looking out for some change, as we have got an excellent opportunity to work with us as a Sales Manager. As you know we are a leading brand in Insurance.”
“Sounds great. Pls go ahead.”
“Okay, so Preeti, the job location will be at Parel. I don’t think there will be any problem for commuting as you reside at Ghatkopar?”
“No off course not.  Rather it’s a daily route for me, as my current office is based in a western line”
“Great, so Preeti why don’t you get me through your profile”
अशाप्रकारे हे conversation चालू राहिले. समोरून प्रश्ने येत राहिले आणि मी तिचे समाधान करत राहिले
“Okay…..Your profile and experience matches our expectations.  Now can I ask you a question which is more into personal?”
“Yeah…. Pls….” पुढचा प्रश्न काय असणार हे एव्हाना लक्षात आले होते.
“Any plan for kid?”
“ummm…. Yes…. We are planning this year”
.............. एका क्षणाचा पॉज़
“okay….. so Preeti, will have your profile discussed with our Centre Manager and let me get back to you some time later.”
“Okay….”
'आम्ही नंतर कॉल करू' ह्या वाक्याचा अर्थ आतापर्यंतच्या अनुभवाने मला समजला होता म्हणूनच मी सुद्धा फोन ठेवून दिला.

शेवटच्या - वाक्यांपर्यंत माझ्या आवडलेल्या प्रोफाइलमुळे माझा इंटरव्हयू नक्कीच होणार अशी आशा निर्माण करणाऱ्या तिला माझ्या एका वाक्याने माझे प्रोफाइल रद्दबातल करायला भाग पाडले!!!!!

काय होते ते वाक्य?

WE ARE PLANNING THIS YEAR

मातृत्व.....एका जीवाला ह्या जगात आणण्याची जादू, जीवनचक्र चालू ठेवण्याचे सामर्थ्य फक्त स्त्रीत आहे. कित्ती मोठी गोष्ट आहे हि, पण हीच गोष्ट तिच्या करियरमध्ये अडथळा निर्माण करू शकते? हा खरेतर एंडलेस परिसंवादाचा विषय आहे आणि मला त्यात आता तरी पडायचे नाही. पण..... हा पण काही केल्या पाठ सोडत नाहीये.

आणि...... खात्री पटली कि २१वे शतक. स्त्री-पुरुष समानता. स्त्रियांचे हरेक आणि प्रत्येक क्षेत्रात पुरुष्यांच्या बरोबरीने असणारे योगदान, ह्या गोष्टी फक्त बोलण्यासाठी आहेत. स्त्रीला जर ती विवाहित असेल तर प्रत्येक इंटरव्हयूमध्ये हा प्रश्न विचारला जातो; जर विवाहित नसेल तरी तिच्या टॅलेंटपेक्षा ती लग्न केव्हा करणार ह्या प्रश्नाला महत्व दिले जाते; जर तिला बाळ असेल तर ती तिच्या कामावर लक्षच देऊ शकणार नाही असे ह्यांचे ठाम मत असते.
मग एखाद्या विवाहित पुरुषाला, लग्नासाठी होतकरू मुलाला, का नाही असे प्रश्न विचारले जात? एखादा पुरुष किंवा मुलगा ह्या कारणांसाठी रिजेक्ट झाल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.

मग अशावेळी एकाच मार्ग उरतो, जो माझ्या माहितीतल्या जवळ जवळ ८५-९०% स्त्रियांनी स्वीकारला, तो म्हणजे करियरमध्ये पुढे जाता आहे तिथेच कंटिन्यू करावे आणि  बाळाच्या जन्मानंतर महिन्यांची रजा घेऊन रेज़्यूमे  करावे (बऱ्याच ऑफिसेसमध्ये महिन्यांची सुट्टी अजूनही इम्पलिमेन्ट झालेली नाही *) . नाहीतर महिन्यांच्या बाळाला सोडून जात येणार नाही तर सरळसरळ गॅप घ्यावा - वर्षांचा.
मग कधी मूल लहान आहे म्हणून तर कधी त्याच्या गरजांकडे द्यायला वेळ नाही मिळत म्हणून, अशा एक अनेक कारणांनी करियरचे पुढचे दरवाजे बंद केले जातात.

नंतर मूल स्वतःचे स्वतः करू शकते असे वाटू लागल्यावर पुन्हा पुढे जणांचा विचार उचल खातो पण तोपर्यंत जग, टेक्नोलोंजि, सर्वे काही पुढे गेलेले असते, आपण मात्र मागेच असतो. त्यात यंग जेनरेशन चे नवीन टॅलेंट, आपले वय, गॅपमुळे भिनलेला थोडासा आळशीपणा, ह्यासगळ्यांशी टफ फाइट सुरु होते आणि मग मिळेल ते हाताला धरून 'वर्किंग विमन ' हा टॅग लावल्याचे ()समाधान मानत पुढे जायचे.

काय आहे ह्या सगळ्याच्या मागे? महिन्यांची भरपगारी सुट्टी? कि गरोदरपणात होणाऱ्या मानसिक, शारीरिक बदलामुळे कामावर तर परिणाम होणार नाही हि भीती?

ह्या सगळ्यामागे आहे ते मातृत्व हि देणगी मानता ते एक आजारपण असल्याची मानसिकता.


 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com IndiBlogger - The Largest Indian Blogger Community