तिचा सूड....... भाग 4 अंतिम

"Nothing is wrong darling" पाठून अचानक आवाज आला. ओळखीचा वाटला म्हणून मागे वळून पाहिले तर  यश हाताची घडी घालून रीयाकडे पाहत होता आणि सोबत राहुलही होता. त्या दोघांना बघून मला आश्चर्य वाटले. 
"अरे यश आणि राहुल तुम्ही इथे?" मी हळूच रियाला चिमटा काढत म्हटले.
"अजय, give me keys, फस्त." माझा हात झटकत रियाने चावीसाठी हात अजयपुढे  केला.
"एव्हढी कसली घाई आहे" म्हणत यशने रियाचा हात पकडला.
"you XXX…….. leave my hand" रिया स्वतःला सोडवण्याच्या प्रयत्न करत होती.
मला काहीच काळत नव्हते काय चालू आहे.
"काय चालू आहे हे सगळे. यश सोड तिला"
"थांब हा मी सांगतो तुला" राहुलने माझे हात पकडले.
"राहुल काय करतोयस हे, सोड" राहुल आणि यशचे हात आमच्या कंबरेभोवती आले होते.
मदतीच्या आशेने मी अजयकडे पाहिले.
“तुला अजूनही नाही कळले..... you are so simple" म्हणत राहुलने माझ्याभोवतीचे हात घट्ट केले. "अग आमच्याच सांगण्यावरून तर अजय तुम्हाला इथे घेऊन आला न. काय अजय"  अजयला टाळी देत यश बोलला.


थोड्या वेळाने जेव्हा जाग आली तेव्हा आम्ही हात पाय बांधलेल्या अवस्थेत होतो. कुठे आहोत काहीच काळात नव्हते, आजूबाजूला पहिले तर समोर तिघेही हातातले ग्लास नाचवत हवेत धूर सोडत होते आणि आम्ही एका पुल खाली होतो, कदाचित जंगलात खूप आत. तोंडावर बांधलेल्या पट्टीने आमचा ओरडण्याचा प्रयत्न अयशस्वी केला.

"डार्लिंग किती चुळबुळ करशील." यशने रियाच्या तोंडावरची पट्टी काढली आणि आणि रिया काही बोलण्याच्या आतच यशची बोटे रियाच्या गालावर उमटली.
 "लागले का? आठवले काही..... सो नोउ लेट्स हव द फन विथ थ्रिल जान".
उतरवल्या जाणाऱ्या  कपड्यांसोबतच आमची अगतिकता अश्रूंतून ओघळत होती.

"नाही.... नको..... प्लीज आम्हाला सोडा..... लेट अस गो..... प्लीज" आमचे ओरडणे, विव्हळणे..... आमचा आवाज त्यांच्या पर्यंत पोहोचतच नव्हता.  लाचार नजरेने आम्ही दयेची भिक मागत होतो, पण सुडाच्या भावनेत बुडालेल्या यशवर आणि त्याला मैत्रीच्या नावाखाली साथ देणाऱ्या वासनाधीन झालेल्या राहुलवर काहीच परिणाम होत नव्हता. अजयसुद्धा मिळालेल्या पैशांना जागत होता.
आमच्या अब्रूची लक्तरे तोडली जात होती.

"मज्जा आली न जान?" निर्वस्त्रावस्थेत पडलेल्या आम्हा दोघींकडे पाहून तिघेही चिअर्स करत होते.

"साहेब, कशी असते हि मजा. जरा बघू का. तोंडाला पाणी सुटलय बघा." नशेत चर्र झालेला अजय आपल्या ओठावरून जीभ फिरवत अघाशीपणे आम्हाला नजरेनेच खात होता.  
“हाहाहाहा …………….जा अजय जा…………जी ले अपनी जिंदगी…….” यशने बाटली अजयच्या पाठीवर थोपटत म्हटले.
“रानटी पाखरू नाय झेपणार बुवा आपल्याला. आपल्यासाठी साधी चिमणीच बरी." अजय माझी दिशेने येत होता. 
“अजय प्लीज...... नको....." माझे रडणे आणि रियाचे सोडवून घेण्याच्या प्रयत्नात हातपाय आपटून घेणे. राग, लाचारी, अस्वस्थता, अश्रू, अगतिकता, सारे काही तिच्या नजरेत होते. 
"लिव्ह हर..... यु बास्टर्ड  " रिया अजयवर ओरडली तसा राहुल रियावर तुटून पडला.
"डोन्ट गेट जेलेस डीअर. मी आहे न".



मध्यरात्र  उलटून गेली.
"अरे... हि तर पूर्ण थंड पडली आहे..... ए उठ, अजून मजा संपली नाही. उठ" माझ्या हाताला पकडून यश बोलला तसा अजय जवळ आला.
"साहेब, हि तर गेली." माझ्या गळ्याला दाबत अजय बोलला. 
"नाही......" रियाची किंचाळी आसमंतात घुमली.
"ओह शिट. ये तिचे तोंड आधी बंद कर. असे कसे झाले. अरे" राहुल अजयवर ओरडला. 
“u……..u killed her…. U basterd….. I wont leave you” रिया रडत होती.
“सॉरी  प्रीती. तू नाही बोलत असताना सुद्धा मी तुला इथे राहण्यासाठी फोर्स केला. मी... मी रीस्पोन्सिब्ल आहे तुझ्या ह्या सिचुएशनला. प्लीज मला माफ कर."
"यश, थिंक, आता काय करायचे, माझे तर डोकेच चालत नाहीये."
"मी सुद्धा तोच विचार करतोय"
"साहेब मी सुचवू का काही." अगदी थंड स्वरात अजय बोलला. "एवढ्या आत जंगलात कोणीच येत नाही. तेव्हा हिला इथेच पुरून टाकू, काय म्हणता"
"ह्म्म्म............ पण.............. ओके. तसेही विचार करायला वेळ नाही. पण हिचे काय करायचे" रीयाकडे बोट दाखवत यश म्हणाला. 
"ती तिच्या मैत्रिणीसोबत आली होती, तिच्यासोबतच जाईल" राहुल.
"डन. अजय सुरुवात कर".


"साहेब, झाले" अजयच्या हाकेबरोबर हातातले कॅन टाकत यश आणि राहुल आमच्याकडे आले.
यशने मला खड्ड्यात ढकलले आणि राहुल रियाचे पाय ओढत तिला खेचत होता. ओढले जाताना टोचणारे दगड, रियाच्या पाठ रक्तबंबाळ करत होते. रियाचे अश्रू तिच्या वेदनांची जाणीव करून देत होते.
यशने लाथेने रियाला ढकलले. रिया माझ्याबाजूला येउन पडली.

"हे घे. काम पूर्ण कर. पण एक लक्षात ठेव. इकडची गोष्ट तिकडे कळत कामा नये." यशने अजयच्या हातावर पैसे ठेवले
 "राहुल, आतापासून तू मला ओळखत नाहीस आणि मी तुला." बिअरचा शेवटचा घोट घेत यश म्हणाला.

----------------------------------------------------------------------------------------------------------

एका वर्षानंतर......................


घड्याळ साडेअकराची वेळ दर्शवित होते. विजांचा कडकडाट मुसळधार कोसळणाऱ्या पावसाला साथ देत होता. दिवे गेले असल्याने रात्रीच्या अंधारात अजूनच भर पडत होती.
  
डिंग डोंग... अचानक वाजलेल्या बेलने तो दचकून उठला.
"च्या आयला कोण कडमडतय ह्या पावसात, ते सुद्धा रात्री साडेअकरा वाजता." म्हणत तो दरवाज्यापर्यंत आला.
"कोण" दरवाजा उघडत त्याने विचारले. अंधार इतका होता ती काहीच दिसत नव्हते.
मोबाईलच्या प्रकाशात समोर उभ्या असलेल्या मुलीचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत त्याने पुन्हा विचारले "कोण? अहो बोला काहीतरी".
दूर उभ्या असलेल्या कारकडे बोट दाखवत ती उत्तरली "माझी गाडी बंद पडली आहे. त्यात रस्त्यावर  दिवेही नाहीयेत. कदाचित पावसामुळे असेल. एवढ्या पावसात काय करू कळत नव्हते.  समोर हे घर दिसले म्हणून मदतीच्या आशेने आले आणि विजेच्या उजेडात घरावर हि पाटी दिसली 'रोडवे'".

"हो हो. रोडवे. या न आत या. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आल्या आहात." तिच्या मंजुळ आवाजामुळे तिचा चेहरा पाहण्याची इच्छा आता तीव्र झाली होती.
"पाउस काही थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहेत.  आज तुम्ही इथेच थांबा. आतल्या रूम मध्ये माझे कपडे आहेत ते चेंज करून घ्या. संपूर्ण भिजला आहात. माझे चालतील ना, नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर" मिनी स्कर्टमधून दिसणाऱ्या तिच्या पायांकडे पाहत तो म्हणाला.
"हो हो चालेल.  अहो हरकत कसली, खूपच मदत करत आहात तुम्ही. तुमचे आभार कसे मानू कळतच नाही." तिने त्याचे हात हातात घेत म्हटले.
"अहो मदत कसली. तुमच्या सारख्या म्हणजे.... अडचणीत असलेल्यांना मदत करणे माझे कर्तव्यच नाही तर  माझे कामही आहे. रोडवे नावाची travel एजन्सी आहे ना माझी." आपल्या हातांभोवती असलेल्या तिच्या हातांकडे पाहत अजयचे मन काही वेगळाच विचार करत होते.
"हो..... रस्ता चुकवून मदत करणे तुमचे काम आहे ना"
"उम्म्म, काही म्हणालात का"
"नाही.... थंडी खूप वाजतेय ना, त्यात हे ओले कपडे" म्हणत तिने आपल्या शर्टचे वरचे बटन काढले.
"हो हो, मी देतो तुम्हाला माझे कपडे. तो पर्यंत तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करा. बरे वाटेल तुम्हाला. बाथरूम तिथे आहे."अजय अजूनही तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत होता.

थाड.......
अजय वळला तसा डोक्यावर झालेल्या प्रहराची जाणीव झाली आणि हळूहळू शुध्द हरपत गेली.
अजय शुद्धीवर आला, तशी त्याला ठणकणाऱ्या डोक्याची जाणीव झाली. हाताने डोके घट्ट पकडावेसे वाटले, पण हात उचलले जात नव्हते. खुर्चीवर बांधले गेलो असल्याचे त्याच्या लक्षात आले.

"तू..... नाही..... नाही..... तू.... तू क.... कशी......" रियाला  समोर पाहून अजयची बोबडी वळली. घाबरून उठण्याच्या प्रयत्नात तो खुर्चीसकट खाली पडला.
"अर्रे व्वा. ओळख अजूनही आहे. गुड. तू विसरला नाहीस. तुला आठवून देण्याची मेहनत वाचली माझी."
"प....ण.... तू.... क..... शी...."
"ये गप ये" हातातला ग्लास अजयच्या गालावर फोडत रिया म्हणाली "ऐक, आता जास्त आवाज नाही करायचा आणि चुपचाप यशला फोन करायचा. ओके".
आधीच भेदरलेल्या आणि त्यात आता गालावर झालेल्या वारामुळे प्रतिकार करण्याची ताकदच उरली नव्हती.
रियाने अजयच्या मोबाईलवरून यशला फोन केला आणि लाउडस्पीकर ऑन केला.
"हेल्लो...." पलीकडून आवाज आला.
"हे... हे... लो... हेल्लो" अजय थरथरत होता. "ये, नीट बोल" रियाने फोनवर हात ठेवत अजयच्या पोटात लाथ घातली तसा अजय कळवळला.
"हे... हेल्लो... हेल्लो यश"
"येस.... व्हूज धिस"
"यश, यश मी" पुन्हा एक लाथ कंबरेत बसली.
"यश....... मी अजय"
"अजय"........... चार क्षणांच्या शांततेनंतर यशचा आवाज आला "तू.... तू क फोन केलास. तूला सांगितले होते ना, फोन नाही करायचा."  यशच्या आवाजात राग आणि भीती झळकत होती. "आणि माझा हा नंबर तुला कुठून मिळाला".
"न... ना.... नाही... य....
"हे बघ अजय, मला काही बोलायचे नाही ना काही ऐकून घ्यायचे. मी फोन ठेवतोय."
"री... रिया....."
"का..... य.... री... रिया...." रियाचे नाव ऐकताच यशच्या हातातून फोन खाली पडला. स्वतःला सावरत फोने हातात घेत यश म्हणाला "रिया... व्हाट? कॅमोन अजय...... स्पीक अप....." पण फोन कट झाला होता.


"रिया प्लीज.... माफ कर.... माझी चूक झाली..... प्लीज रिया......" अजय दयेची भिक मागत होता.
"काय झाले अजय..... रानटी पाखरू झेपले नाही ना तुला" म्हणत रियाने अजयच्या खड्ड्यात माती टाकायला सुरुवात केली.



"हेल्लो..... राहुल............ राहुल........... यश बोलतोय"
"यश....... तू.......... से ब्रो............ हाऊ आर यु? आणि इतक्या रात्री फोन केलास. इज एव्हरीथिंग ऑलराइट"
"उद्या दुपारी २ वाजता माहीम स्टेशन बाहेर सी सी डी मध्ये भेट"
"अरे पण काय झाले? आणि आपण कधी भेटायचे नव्हते ना?
"आता काही बोलू नकोस. दुपारी भेटून बोलू".


"का....य..... हाऊज धिस पोसिबल?  तू एक काम कर, अजयला पुन्हा एकदा फोन कर. मला वाटते हि नीड्स सम मोअर मनी" राहुलचा विश्वास बसत नव्हता.
तुला काय वाटते, मी फोन केला नसेन. आतापर्यंत हजारवेळा फोने केला, पण त्याचा नंबर डज नॉट एक्जीस्त येतोय".
"अरे पण एक वर्ष झाले ह्या गोष्टीला. आता कशाला अजय तुला फोन करून तिचे नाव घेईल. नशेत चढली असेल त्याला."
"जर नशेत असेल, तरी एक प्रश्न राहतोच ना, कि त्याच्याकडे माझा हा नंबर कुठून आला. हा नंबर तर मी तिथून आल्यावर घेतला आणि तुझ्याकडे सुद्धा नव्हता. सगळे पुरावे आपण नष्ट केले. मग आता त्याने तिचे नाव घेऊन फोन कट का केला. जर पैसेच हवे होते तर पुन्हा फोन का नाही केला."
"ह्म्म्म्म.... राइट" राहुलसुद्धा विचारात पडला.
"आपल्याला तिथे जायला हवे. आजच निघू" कसलातरी तरी विचार करत यशने राहुलला निघण्याची तयारी करायला सांगितले.


Hotel Evening Snow
रात्रीचे साडेदहा अकरा वाजले असतील. कार पार्क करून यश तडक रिसेप्शनवर गेला.
"मी एका वर्षापूर्वी माझ्या काही मित्र-मैत्रिणींसोबत इथे आलो होतो. त्यातल्या दोन मुलींचे डीटेल्स मला हवे आहेत. २०.०४.२०१२ चा रेकॉर्ड चेच्क करून सांगा". यशने म्यानेजरला सांगितले.
"सर, विझिटर्सचे रेकॉर्ड्स कोन्फ़िडेन्शिअल असतात. सोरी. आम्ही ते तुम्हाला नाही दाखवू शकत."
"आय वौट टू सी इट." यश ओरडला.
"Sir pls understand. It is confidential आणि प्लीज तुम्ही शांत राहा”
"तुझ्या तर........" यशने एव्हाना कॉलर पकडली.
“Sir pls behave yourself and calm down” म्यानेजर स्वतःची कॉलर सोडवत म्हणाला.
“Yash… stop it, सोड त्याला. मारामारी करून काही मिळणार नाही." यशने रागाने स्वताची मुठ समोरच्या भिंतीवर आपटली.
"बी काल्म” म्हणत राहुलने खिशातून 500 ची एक नोट काढून म्यानेजर समोर धरली.
त्याने एकदा त्या नोतेकडे पहिले आणि लालसेने राहुलकडे पाहिले. राहुले अजून एक नोट काढली.

"सर, प्लीज लवकर चेक करा, कोणी पहिले तर माझी नोकरी धोक्यात येईल." त्याने एकदा चहुबाजूला पहिले आणि कोणी पाहत तर नाही ना याची खात्री करत ते रजिस्टर राहुलच्या हातात दिले.
यशने घाईघाईतच ते खेचून घेतले आणि पटापट पाने चाळू लागला.  

१६.०४.२०१२, १७.०४.२०१२, १८.०४.२०१२, १९.०४.२०१२, २१.०४.२०१२; यशने पुन्हा एकदा चेक केले. १६.०४.२०१२, १७.०४.२०१२, १८.०४.२०१२, १९.०४.२०१२, २१.०४.२०१२; यशने पुन्हा पुन्हा रजिस्टर चेक केले.
"हे काय आहे? १६.०४.२०१२, १७.०४.२०१२, १८.०४.२०१२, १९.०४.२०१२, २१.०४.२०१२. २० एप्रिलचा रेकॉर्ड कुठे आहे? २० तारखेचे पान कुठे आहे?" यशचा राग वाढला होता.
राहुललासुद्धा काहीच काळत नव्हते. त्याने म्यानेजार्कडे पाहिले आणि अजून एक नोट त्याच्या हातात कोंबली.
"२० तारखेचा रेकॉर्ड तर अजयने तेव्हाच फाडून टाकला होता. जवळ जवळ एक वर्ष झाले असेल. आता त्यालाच माहित ते पान कुठे आहे ते".
"अजयचा नंबर आहे तुमच्याकडे त्याला बोलवून घ्या. सांगा आम्ही आलो आहोत".
"सर त्याचा नंबर लागत नाहीये. मी गेले दोन दिवस त्याला हॉटेलच्या कामासाठी फोन करत होतो. आणि गेल्या दोन दिवसात कुठे दिसला सुद्धा नाही तो."


यश आणि राहुलने हताश होऊन सोफ्यावर येउन बसले. "सर, अजून काही हेल्प हवी असेल तर सांगा. We are happy to server you” म्यानेजारचा आवाज येत होता.

"यश...... जस्ट चिल. तू उगाचच panic  होत आहेस. उद्या सकाळी आपण अजयच्या घरी जाऊ. ओके" कॅन संपवत राहुल यशला समजावत होता. "चल, मी रूमवर जाऊन झोपतो. तू सुद्धा झोप आता".


‘I have got to know about it. Ajay told me about everything. We are waiting for you below that  bridge. Come soon, we are waiting’ राहुलच्या मोबाईलवर यशचा मेसेज आला.
बेडवर तळमळत असलेल्या राहुलने घड्याळात पाहिले. सव्वा बारा वाजले होते. मेसेज वाचून राहुलला जर बरे वाटले. "चल एक टेन्शन कमी झाले" तो लगेचच हॉटेलच्या बाहेर पडला.


“यश …………… अजय ………………Where are you guys………………….”
“य......श …………… अ......जय ………………राहुल पुलाखाली उभा राहून दोघांना शोधत होता. दुरदुरपर्यंत कोणाचा मागमूस नव्हता. शेवटी राहुलने यशला फोन केला.

"हेल्लो....." यशचा झोपेत असलेला आवाज आला.
“Yash where are you bro, I am waiting”
“You are waiting, for what…………..”
"यश.... आता मस्करी नको. ऑलरेडी डोके फुटण्याची वेळ आली आहे. आता लवकर सांग तू आणि अजय कुठे आहात?"
"राहुल.... अरे कसली मस्करी. आणि अजय तो कुठे भेटला?
"अजय अरे तुला भेटला न तो.... तुच मला मेसेज केला कि तुला अजयने सगळे सांगितले आणि तुम्ही दोघे माझी वाट पाहत आहात पुलाखाली".
"मी.... मी केला मेसेज? अरे झोप येत नव्हती म्हणून तुला फोने करून बोलावणार होतो पण माझा फोनच सापडत नव्हता. कुठे ठेवला ते आठवतच नव्हते. अंघोळ करून आल्यावर बघतो तर बेडवरच होता. एक मिनिट....पण तुला हा मेसेज...... म्हणजे......" यशच्या आवाज भीतीने थरथरत होता. 
राहुलच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि घामाने शरीर भिजून गेले.
"नाही.... काही नाही.... मी तुला फोन करतो" राहुलने फोन बंद केला. आपण कशाततरी अडकलो आहोत हे राहुलला समजले पण त्याला यशची भीती वाढवायची नव्हती आणि स्वतःला लवकरात लवकर त्यातून सोडवायचे होते. तिथून निघण्यासाठी तो वळला आणि...... थाड.... थाड.... त्याच्या डोक्यावर काहीतरी जड वस्तू आपटली.

शुद्ध आली तेव्हा राहुलचे हात बाधलेले होते आणि पाय गाडीच्या दिक्कीला बाधलेले होते. आणि समोर दिक्कीवर बसून रिया बिअर पीत होती.

“Hieeee…. Rahul………. How are you baby” रियाने राहुलकडे प्रेमाने पाहत विचारले.
"र... री... या.... रिया.... तू? राहुलने विचारले.
“येस डार्लिंग. द फन इज येट टू गेट कॅम्प्लीटेड" म्हणत रियाने राहुलच्या तोंडात बिअरची बाटली उलटी धरली. श्वास न घेत आल्यामुळे राहुलची तळमळ वाढत होती.       
"काय झाले राहूल? त्रास होतोय? मी आणि प्रीतीसुद्धा अशाच पाहत होतो तुमच्याकडे हेल्पलेस होऊन. तुला आठवतंय राहुल, टू मला खेचत घेऊन जात होतास. माझ्या पाठीला दगड, काटे टोचत होते. मी ओरडत होते पण तुला मात्र खूप मज्जा येत होती न. चल तर तीच मज्जा आता पुन्हा घेउया." म्हणत रिया गाडीत बसली आणि गाडी सुरु केली.

३०,,,,४०,,,,५०,,,,६०,,,,७०,,,,८०,,,,९०,,,,,१०० वाढणाऱ्या गाडीच्या स्पीडसोबतच सरपटल्या जाणाऱ्या राहुलच्या वेदनेचा आवाजही वाढत होता.
मला मात्र राहुलच्या पाठीतून निघणारे रक्त पाहून आणि त्याच्या किंकाळ्या ऐकून आनंद होत होता.

अर्ध्या तासानंतर गाडी थांबली आणि राहुलचे श्वासही.


हॉटेलमध्ये येरझारा घालत यशला काहीच काळात नव्हते. त्याने तर कोणताही मेसेज केला नव्हता मग राहुल असे काय बोलत होता आणि त्याचा सुद्धा फोन लागत नव्हता. कदाचित आपण जर जास्तच विचार करतोय आणि राहुलही नशेत बोलला असेल. आणि तसेही जर राहुल पुलाखाली गेला असता... तर म्यानेजारच्या म्हणण्याप्रमाणे गेट मधून बाहेर जाताना त्याने कोणालाही पहिले नव्हते. यश पुन्हा झोपायला गेला. 

दोन अडीच वाजले असतील. यशचा मोबाईल ब्लिंक झाला. झोपेच्या प्रयत्नात असलेल्या यशने लगेच मोबाईल घेतला. राहुलचा whatsapp msg आला होता. राहुलेने कसलीतरी इमेज पाठवली होती.  
इमेज डाऊनलोड होईपर्यंत यशसुद्धा राहुलचा मेसेज पाहून relax  झाला होता. तेव्हढ्यात डाऊनलोड झालेली इमेज पाहून यशच्या तोंडचे पाणी पळाले. 

रक्ताळलेल्या राहुलचा फोटो आणि त्याखाली लाल अक्षरात लिहिले होते, 'Now its your turn my jaaaan. Be ready.’ यशने मोबाईल दूर फेकला. त्याचे संपूर्ण शरीर कांपत होते. 


काही वेळातच यशची कार फुल स्पीडने रस्त्याला लागली होती. यश बराच पुढे निघून आला होता. पाठी एकदा वळून त्याने पहिले. मोकळ्या रस्त्याशिवाय काहीच नजरेस पडत नव्हते. ते पाहून त्याला जर हायसे वाटले. तेवढ्यात एक सफारी खूप स्पीडने जवळ येत होती.

काही कळायच्या आतच १.... २.... ३.... ४.... यशच्या कारला सफरीची धडक बसत होती. यशचे त्याच्या कारवरचे नियंत्रण सुटले आणि कार एका झाडावर जाऊन आपटली.

रियाने खेचतच यशला बाहेर काढले. यशच्या डोक्याला मार लागला होता पण शुद्ध मात्र होती.
“Hi my sweetheart. ओळखले नाही का तुझ्या जानुला ” यशच्या पोटात लाथ घालत रियाने विचारले तसा यश कळवळला. भीती, आश्चर्य, राग, वेदना त्याच्या नजरेत उमटत होती आणि शरीर कापत होते.

"Jaaaan………….. दुखतंय का जास्त. Don’t worry I will take full care of yours.” रियाने यशचे हात पाय बांधायला सुरुवात केली. डोक्याला लागलेला मार आणि समोर रिया, यशमध्ये  प्रतिकार करण्याची ताकद नव्हती. 

"खिशातून चाकू बाहेर काढून तो यशच्या गालांवरून फिरवत रियाने विचारले, “Want to have thrilling fun baby? Lets go then n have a blast my jaaan”.

चाकूचे टोक यशच्या दोन भुवयामध्ये होते. तिथून हळूहळू उजव्या गालावरून खाली ओठावर आणि मग हनुवटीवर आले, पण सोबत आपल्या वाराचे निशाण ठेवूनच.
"आआई............." यशच्या किंकाळी शांततेत उमटली, जेव्हा त्याच्या छातीवर सुधा वर झाला. 



चिरफाड झालेले शरीर , त्यातून ओघळणारे रक्त आणि वेदनेने भरलेले यशचे विव्हळणे..... "रिया... प्लीज.... प्लीज मला माफ कर.............. माझ्याकडून चूक झाली..... रिया........."

 "प्लीज, स्तोप, माफी, सोरी.... हे शब्द तुझ्या ओठी शोभत नाहीत यश. रिव्हेंज, बदल, सूड, हे शब्द तुला जास्त सूट होतात." यशच्या शरीरावर चाकुची नक्षी उमटत होती.
"यश................" यशच्या बोटांवर माझा पाय ठेवत यशला हक मारली.
"प्र.... प्र... प्र....प्रीती........" 

रियाने मोबाईल बाहेर काढला. एकच क्षण......... आमच्या सेल्फिजचा क्लीक्लिकाट नजरेसमोर तरळून गेला. चेहऱ्यावर एक हलकेसे हसू आले, पण यशच्या विव्हाल्ण्याने त्याची जागा पुन्हा संतापाने घेतली. 

क्लिक.... उजेडाने यशचे डोळे दिपले. रियाने यशचे गाल हाताने पकडले, त्याबरोबर तो अजूनच कळवळला. रियाने मोबाईल त्याच्या समोर धरला आणि त्याला नुकताच काढलेला फोटो दाखवला. फोटो पाहून यशचे तोंड उघडेच राहिले.

‘REVENGE’ त्याच्या छातीवर कोरलेली हि ती अक्षरे.

“Revenge…………. हाच शब्द जो तू मला लक्षात ठेवायला सांगितला होतास आणि त्या एकाच शब्दासाठी आम्ही दोघी परत आलो.”

सप.....सप.....सप.....सप..... माझ्या हातातील चाबूक चालतच होता... आणि यश............ जीवाच्या आकांताने ओरडत होता................ पण यशला मी एव्हढ्या सहजासहजी मरू देणार नव्हते. 

रियाने यशकडे पहिले. त्याच्या डोळ्यातील भीती, असहाय्यपणा, लाचारीपणाचे भाव पाहून रिया मनोमन सुखावली.      

“Jaaanu……. Hope you are enjoying…….. मज्जा तर येते आहे न तुला.”
त्याने माफीच्या भावनेने एकदा तिच्याकडे व एकदा माझ्याकडे पाहिले. त्याला होणाऱ्या यातना माझा आनंद वाढवत होत्या.

“ये उठ ये झोपू नकोस” त्याची हरपली जाणारी शुद्ध पाहून रियाने त्याच्या तोंडावर पाणी मारले. 
यशच्या तोंडून आवाज फुटत नव्हता. 

पहाट होत होती. आजूबाजूला दाट झाडी आणि समोर तेवढेच दाट तलाव होते.
समोरील ते दृश्य पाहून एक क्षण यश देखील आपल्या वेदना विसरला.

"तो तलाव दिसतोय यश........... तोच तलाव जो तू मला दाखवला होता.... पाण्यापेक्षा मगरीच जास्त असलेला तो तलाव. अश्या ह्या तलावात पोहोणे म्हणजे रिअल थ्रिल".

“N…oooo……..nooooo……… plea…….se” 

त्याच्याकडे लक्ष न देत मी त्याला त्या पाण्यात ढकलले.

नवीन पहाट  झाली होती. आकाशात आणि पाण्यात एकाचवेळी लाल रंग उमटायला सुरुवात झाली.

मी धावत जाऊन रियाला मिठी मारली. 

उजळणाऱ्या आसमंताने  आमचे चेहरे सुद्धा उजळून निघाले.

तिचा सूड....... भाग 3

तिचा सूड....... भाग 3

"Friends?" रियाने मैत्रीचा हात पुढे केला.
"ओह why not. अशा सुंदर आणि बिनधास्त मुलीची मैत्री कोणाला आवडणार नाही" यशने रियाचा हात आपल्या हातात घेतला.
रिया मंद हसली.

काही वेळ झाला असेल नसेल........... अचानक यशने रियाला जवळ खेचले. डावा हात तिच्या कंबरेभोवती घालून उजव्या हाताने त्याने तिची हनुवटी वर उचलली. काही कळायच्या आतच तिच्या ओठांवर त्याने ओठ टेकवले. 

“What is this Yash” यशला दूर ढकलत  रिया त्याच्यावर ओरडली. आश्चर्य आणि राग ह्यांचे मिश्र भाव रियाच्या चेहऱ्यावर उमटले होते. 

“What……….. have I done anything wrong?” यशने हसत रीयाकडे पाहिले.

“Wrong?” 

“Oh, Come on Riya…. Its fun…. Isn’t it?” यशने रियल जवळ ओढण्याचा प्रयत्न केला
 "म्हणूनच तर आपण दोघेच इथे आलो ना. तूच बोलली होतीस, let’s go and have a thrilling fun. मग आता का असे करतेस?”

“Enjoy???”रियाने त्याचे आपल्याभोवती असलेले हात झटकत म्हटले 
“Thrilling fun  आणि हे असे??? Are you out of your mind? मी तुझ्यासोबत इथे आले, आपण एकत्र ड्रिंक्स घेतले,  that doesn’t mean कि तू मला किस करशील. मी तुला मित्र समजून इथे आले आणि तू............ शी..............”

“friends….. रात्री साडेतीन चार वाजता एक मुलगी एका मुलासोबत जंगलात येते आणि त्याला फक्त फ्रेंड बोलते?" फ्रेंड शब्दावर जोर देत यशने रियाला पुन्हा एकदा मिठीत घेतले. "और वैसेभी एक लडका और एक लडकी सिर्फ दोस्त नही हो सकते."

"Leave me Yash"

"Come on Riya, okay okay.......... फ्रेंड्स तर फ्रेंड्स. पण मी तुला इथे घेऊन आलो तर निदान मला त्याचे बक्षीस तरी मिळायला हवे ना." असे म्हणत त्याने पुन्हा एकदा रियाच्या ओठांवर आपले ओठ टेकवत म्हटले.

थाड…….. “Be in your limit” यशच्या गालावर रियाची बोटे उमटली.

गाल चोळता चोळता यशने रागाने रीयाकडे पहिले “I won’t leave you Riya. You will have to pay for it. just remember this.......... REVENGE” पाठमोर्या जाणाऱ्या रीयाकडे पाहत यश ओरडत होता.
----------------------------------------------------------------------------------------------------------


“गुड मोर्निंग रिया, कसे वाटतंय आता?" झोपेतून उठलेल्या  रियाला मी विचारले. 

"वेरी गुड मोर्निंग डियर" डोळे चोळत रियाने स्माईल करत म्हटले.

"का ग? सकाळी सकाळी का एवढ्या चिंतेत आहेस?"

"सकाळ? मादाम आता ना सकाळ आहे ना दुपार. संध्याकाळचे सात वाजले आहेत."

"What????" रिया बेडवरच उडाली.

"हो आणि म्हणूनच माझ्या चेहऱ्यावर जी काळजी दिसतेय न ती त्यामुळेच आहे. अगं सकाळी उठले, सकाळ कसली दुपार झाली होती. १२ वाजले असतील मी उठले तेव्हा. तर.... तू आजूबाजूला कुठेच दिसली नाहीस. मला वाटले लवकर उठून पूलमध्ये असशील म्हणून तिथे गेले तर तू तिथेही नव्हतीस. मग शेवटी रूमवर आले तर तुम्ही एकदम गाढ झोपला होता आणि झोपेतच काहीतरी बरळत होतीस. तुला उठवण्याचा प्रयत्न केला तर तू कसली उठतेयस. तुझा तो झोपेतच रागावलेला चेहरा बघून सोल्लिड घाबरले मी. मग वाटले कि कदाचित स्वप्न पाहत असशील कसले तरी आणि कालच्या हेक्टिक ड्राइव्हिंग मुळे दमली असशील मग तुला तसेच झोपू दिले आणि मी आवरून खाली गेले. रिसेप्शनवर चौकशी केली तर कळले कि राहुल आणि यश सकाळीच निघून गेले."

मी बोलण्यात अशी गुंतले होते कि यशने नाव ऐकताच क्षणी रियाच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव मला कळलेच नाहीत. मी पुढे बोलतच राहिले "मग पुन्हा वर येउन तुला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. तू उठली नाहीसच मग कसा वेळ काढला ते माझे मला ठाऊक. पिकनिकला जातोय न आपण आणि इतका वेळ झोपायचे?" माझी बडबड चालूच होती.

"यश गेला!!! ...........................हुःश".

"ओह्हो, कोणीतरी कोणालातरी खूप मिस करतय."

"का.... काय"

"हेच की, यशची आठवण येतेय? लैला को मिलनेसे पह्लेही मजनू चल गया."

 "Shut up प्रीती, सकाळी सकाळी डोके फिरवू नकोस." मला मधेच तोडत रिया म्हणाली.

"ओह, इतका राग येतोय, कोणीतरी न सांगता गेले म्हणून. मग उठायचे होते ना आणि थांबवायचे होते त्याला"

“Priti, stop this nonsense and just shut up, okay?” माझ्यावर रागवत रिया म्हणाली.

“Okay, okay, just chill, I am just I am just kidding yaar". एव्हढी का हाइपर  होतेस?"

रियाने पुन्हा त्रासिक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिले.

"ओके, नाही चिडवणार. लिव्ह इट. मला सांग, आर यु ओके नाउ?" रियाला शांत करण्यासाठी विषय बदलत मी विचारले. 

"येस्स. मला काय झाले आहे?"

"काही नाही ग, तुझी काळजी वाटत होती. आज खूपच उशिरा उठलीस, तसेही तू उशीरच उठतेस...... पण आज झोपेत काहीतरी बडबडत होतीस म्हणून विचारले. वाईट स्वप्न पडले का?"

"अं, हो........... हो, वाईट.......  खूप वाईट स्वप्न...... स्वप्नच होते ते." रिया स्वतःशीच पुटपुटली.

"काय... काही म्हणालीस का?"

"नाही.... कुठे काय"

"जाऊदे कालची रात्र मस्त होती न "

"मी अंघोळ करून येते. जेवून लगेच निघू आपण" माझे बोलणे न ऐकताच रिया म्हणाली " बैग्स पैक कर" आणि थाड.... बाथरूमचा दरवाजा बंद झाला.

----------------------------------------------------------------------------------------------------------

"चल मादाम. मी तयार आहे" रीसेप्शनवर बिलिंग होता होता पाठून आवाज आला.

“Oh yeah, lets go”रियाने अजयकडे पाहत म्हटले.

“It was our pleasure to serve you. Have a pleasant and safe journey Madam” आपल्या स्मित हास्याने मेनेजरने आमचा निरोप घेत आमच्या पुढच्या प्रवासासाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या.

“Thank you” आणि आम्ही निघालो.

"रिया, काल धमाल मज्जा आली न. मी उगाचच घाबरत होते आणि उगाचच ह्या अजयवर संशय घेत होते. यु आर राइट. मी घाबरणे सोडून आनंदी राहायला शिकले पाहिजे. Thank you so much, तुझ्यामुळे मी काल खूप एन्जोय करू शकले. 

“You enjoyed na, that’s great” माझा हात पकडत रिया म्हणाली.

"मादाम, मी गाडी चालवू का? नाही म्हणजे रस्ता तितकासा चांगला नाहीये आणि मला शोर्टकट माहिती आहे, म्हणून विचारतोय. तसेहि काल गाडी चालवून तुम्ही दमला असाल ना. आरामशीर मागे बस. मी चालवतो." गाडीजवळ येता येता अजय म्हणाला.

"अरे व्वा, चालेल" म्हणत रियाने चावी अजयला दिली. 


"छान चालवतोस गाडी" कार वेगाने पळत होती.

"लोकांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवण्याचेच तर पैसे मिळतात न मला"

"अं..... काय"

"नाही, म्हटले ट्रव्हेल एजंट आहे न मी, गाडी व्यवस्थित चालवून लोकांना सुरक्षित पोहोचवणे माझे कामच आहे ना" म्हणत अजयने गाडी एका छोट्याशा वळणाकडे घेतली. "हा शोर्टकट आहे".

गाडीच्या हेडलाइटस मध्ये दिसणाऱ्या रस्त्याशिवाय बाकी काहीच दिसत नव्हते. रात्रीच्या त्या दाट काळोखात आजूबाजूची घनदाट झाडी अजूनच भर घालत होती.  जंगलातला तो रस्ता देखील चांगला नव्हता पण अजय गाडी सफाईदारपणे चालवत होता. 


दहा साडेदहा वाजले असतील. कर्र्र..... कर्र्र...... अचानक ब्रेक्स लागले आणि आमचे डोके पुढच्या सीटवर आपटून कार थांबली.

"काय झाले?" आम्ही विचारेपर्यंत अजय खाली उतरला होता. "काही प्रोब्लेम झाला आहे का" रियाने खाली उतरत विचारले. अजय काहीही उत्तर न देता आमच्याकडे पाहत उभा होता.चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते.

"अजय, What's wrong" अजयजवळ जात रियाने पुन्हा विचारले. 

"Nothing is wrong darling" पाठून अचानक आवाज आला.

तिचा सूड....... भाग २

हॉटेल इव्हनिंग स्नो..... हॉटेल तसं चांगलं होतं. मोठ्ठी लॉबी, मस्त गार्डन, इंस्त्रुमेंटल म्युजिक, आणि दरवळणारा मंद सुवास, I guess मोगरा असावा.

"Welcome to Hotel Evening Snow Madam and here is your key to Room No. 213. Your luggage will be sent to your room. Enjoy your stay. रमेश मादामना त्यांची रूम दाखव आणि  सामान त्यांच्या रूम मध्ये नेउन ठेव". हॉटेल मैनेजर अगदी अदबीने बोलत होता.

"बाहेर कसली गर आहे पण इथे बघ."
"हो रे..."
"वाळवंटात एकदम गार्डन वाटतंय......"

"गरमी" म्हणत रिया काउंटरवर आलेल्या दोन टपोरी दिसणाऱ्या मुलांकडे वळली तितक्यात "Hey darling, you done with the formalities, Lets move to our room then" रियाच्या गळ्यात हात टाकत यशने तिला स्वतःजवळ ओढले.
"Hey, leave me." रिया स्वतःला सोडवण्याच्या प्रयत्नात होती.
"नको न रागावू जान. I am sholly na baby." असे म्हणत यशने हॉटेल मैनेजरकडे असे पाहिले आणि तोदेखील असा हसला जसे कि रिया आणि यशचे भांडण झाले आहे आणि यश तीला मनवत आहे.

"काय मित्रा, तुला वाळवंटात गार्डन दिसतंय" रियाच्या कंबरेभोवती हात टाकत यशने त्या दोन टपोरी मुलांकडे पाहिले आणि राहुल, यशचा मित्रदेखील त्यांच्याकडे वळला, तसे दोघेही हॉटेल बाहेर पळून गेले.

"काय  फालतुगिरी चालवली आहेस. कोण आहेस तू. and how dare you to hug me and hold me like this?" रिया स्वतःला सोडवत कडकडली. तसे यशने तिला दूर केले "Thanks बोलायचे सोडून तू माझ्यावरच काय ओरडतेयस".

"Thanks...........!!!! huh...... my foot" रियाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसून येत होता.

"Hey listen, they were trying to......... forget.............. I just tried to help you and you......
Anyway Hi I am Yash....." यशने हात पुढे करत म्हटले. रिया त्याच्याकडे रागाने पाहत मला खेचत लिफ्ट कडे घेऊन गेली.

गरम पाण्याचे फवारे घेतल्यावर थकवा कुठल्या कुठे पळून गेला. 
"काय मग..... राहूया ना आपण इथे" टोवेल माझ्यावर फेकत रिया हसत होती.
"उम्म्म्म..... ठीक आहे, काढू शकतो आजची रात्र आपण इथे. तुमच्या साठी काय पण" उपकार केल्याच्या आविर्भावात मी बोलले आणि ऊशी माझ्या चेहऱ्यावर येउन पडली. मग काय ऊशी मारामारी ऐन रंगत आलेली आणि guitar चे सूर कानी आले. लगेच आम्ही पडदे बाजूला करून खिडकीतून खाली पाहिले. मुलामुलींचा एक ग्रुप firecamp जवळ एन्जोय करत होता. एक मुलगा हातात Guitar घेऊन तल्लीन होऊन गात होता. आम्ही एकमेकींकडे पाहिले, आमची नेहमीची स्माईल हसलो आणि दोघीही तडक खाली गेलो.

हॉटेलच्या मागे गार्डनमध्ये, आमच्यासारखेच ते सगळे, पिकनिकला आले असतील बहुधा.
मधोमध पेटवलेली शेकोटी हवेतल्या गारव्यात थोडा उबदारपणा आणत होती.  त्या धुंद वातावरणात भर टाकणारे आणि कान तृप्त करणारे गिटारचे सूर, थेट हृदयात हळूच शिरणारे  ते गाणे आणि ह्या धुंद, नशेल्या रात्रीला अजूनच मदमस्त करणारा त्याचा आवाज.................
“Dooba dooba rehta hoon aankhon me teri
Deewana ban gaya hoon main chaahat me 'तेरी
heeyyyyy 
Dooba dooba rehtaaaa hoon aankhon me teri
Deewana ban gaya hoon main chaahat me teri………….” 

अहाहा ................ क्या बात....... क्या बात.............. क्या बात......... क्या बात.........

एवढ्या सुरेल आवाजाचा चेहरा कसा असेल !!! दोघींनीही (अर्थपूर्ण) डोळे मिचकावले. पण पाठमोरे असल्याने त्याचा चेहरा दिसत नव्हता. वोडकाचा एक घोट घेऊन दोघी त्याच्या समोर येउन बसलो, त्याला पाहण्याची उत्सुकता वाढली होती आणि..........

 “यश!!!!" दोघीही किंचाळलोच. दुधात मिठाचा खडा टाकावे तसे त्या सुरेल मैफिलीत आमचा आवाज होता. परग्रहावरून आलेल्या एलियनकडे जसे पाहावे तसे सगळे आमच्याकडे पाहत होते. आणि यश...........तो मात्र  आनंद, आश्चर्य अशा मिश्र भावनांनी आमच्याकडे पाहत होता. त्याने मला एक स्माईल दिली आणि रीयाकडे पाहून उजवा डोळा मिचकावला.

"Gulabi Aankhe jo teri dekhi, sharabi ye dil ho gaya,
Sambhalo mujhko … o mere yaron
Sambhalna mushkil ho gaya..........." गिटारने नवा सूर पकडला आणि नजर रियावर.

राहुल हातात बियरचे ३ कॅन्स घेऊन आमच्या बाजूला येउन बसला.
म्युजीकवर डोलत एव्हाना आम्ही त्या ग्रुप मधलेच एक होऊन गेलो होतो. बहरणारी रात्र धुंदी वाढवत होती.  लॉनवरच केव्हा झोपी गेलो ते आम्हालाच कळले नाही. 


"Hi, तू जागी आहेस अजून? सगळे तर केव्हाच झोपलेत" यशने विचारले.
"नाही, मला झोप नाही आली अजून." 
"ड्रिंक्स?" हातातले एक कॅन पुढे करत यश ने विचारले.
"शुअर" रियाने कॅन घेत म्हटले.
"सो.... कसे वाटले गाणे"
"ती गाणी नेहमीच छान वाटतात....."
"Smart.......... I am asking about me"
"About you.......... What"
"माझा आवाज?"
"ओह........... ठीकठाक गातोस.............. OK types"
"Oh reallly........... Thank you Miss....." यश प्रश्नार्थक चेहऱ्याने रीयाकडे पाहत होता.
"मिस. रिया.......... रिया प्रधान. बाय द वे डिरेक्ट्ली नाव विचारले असतेस तरी मी सांगितले असते" रिया एक घोट घेत यशला म्हणाली.
“Bold and beautiful name as bold and beautiful as you. By the way thank you so much for your compliment. ”
“Excuse me…… मी तुला काही कॉम्प्लिमेंट  दिली नाही. तू ठीकठाक गातोस असे बोलले मी, चांगले गातोस असे नाही"
“That’s what dear, तुझी हि कॉम्प्लिमेंट म्हणजेच मी खूप छान गातो"
“Ohhhh yeahhh………….” आणि दोघेही हसू लागले.
"तू नाही झोपलास"
"तुझ्यासोबत जागा आहे"
“Flirting haaaan. don’t try the tricks on me. its not gonnna work”
“Flirting???? खरे बोलण्याला तू Flirting म्हणतेस तर मग.......... yups.....  I am flirting" यशने डोळा मिचकावला.
"हम्म्म्म्म"
"ड्राइविंगने दमली नाहीयेस, तुझी फ्रेंड तर केव्हाच झोपली”
"I am not like typical chuhi-muhi girl आणि तसेही नवीन ठिकाणी आल्यावर झोपेत वेळ घालवणे मला नाही आवडत. त्यापेक्षा I was just thinking to roam in a jungle behind…………." 
"आत्ता? एकटी?" रियाला मधेच तोडत यशने विचारले. 
"So what........"
"You really wanna so?" उभा राहत यशने विचारले. "Lets go then, कम विथ मी" रियाला उठण्यासाठी हात पुढे करत यश बोलला.
"You serious??? Okay...... lets go and have a thrilling fun" रिया यशचा हात पकडत उठत म्हणाली. 

गप्पा मारत, धडपडत, सावरण्यासाठी एकमेकांचा हात पकडत एव्हाना दोघे जंगलाच्या मध्यापर्यंत आले असतील.

"Wooow............. feeling amazing yaaar. खूप मस्त वाटतंय. हॉटेलच्या बोअरिंग  रूम मध्ये झोपण्यापेक्षा जंगलातल्या रात्री चांदण्यांच्या प्रकाशात बोचऱ्या  थंडीच्या साथीने चालण्यातली मजा काही औरच." रिया उत्साहाने बोलत होती. चालून चालून दमल्याने दोघेही काही क्षण थांबले होते. 

यशने आपल्या बॅगमधून  2 कॅन्स बाहेर काढले. एक रियाला देत स्वतःसाठी एक घेतला.

"Friends?" रियाने मैत्रीचा हात पुढे केला.
"ओह why not. अशा सुंदर आणि बिनधास्त मुलीची मैत्री कोणाला आवडणार नाही" यशने रियाचा हात आपल्या हातात घेतला.
रिया मंद हसली.

काही वेळ झाला असेल नसेल........... अचानक

तिचा सूड....... भाग १


तिचा सूड.......  भाग १



प्रीती आणि रिया...... एकविसाव्या शतकातील आणि आजच्या आधुनिक युगाला साजेश्या (प्रातिनिधिक म्हणू शकतो) अशा जिवलग मैत्रिणी. एकाच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या. प्रीती नावाप्रमाणेच प्रेमळ आणि रिया तितकीच बिनधास्त.

.....................................................................................................................................

"रिया लवकर यार.... किती स्लो चालवतेस. सगळे एव्हाना पोहोचले सुद्धा असतील आणि आपण, ६ वाजत आले तरी अजून वाईला सुद्धा  पोहोचलो नाही. काय करतेयस. चल ना, पळव ना गाडी."

"मॅडम, तुम्ही तर काही बोलूच नका? आयला, एकतर तुझ्यामुळे मी सुद्धा गेले नाही सगळ्यांसोबत आणि वरून मलाच बोलतेस. हाच आटिट्यूड घरी दाखवला असतास ना तर..... जाऊदे. त्यात तुझ्या तीर्थरूप.......... च्याआयला परमीशन देणार होतेच ना, मग इतका वेळ का खाल्ला फुकटचा........."

"ए माझ्या डॅडू बद्दल काही बोलायचे नाही.............."

"आली मोठी डॅडुची प्रिन्सेस. मग तू सुद्धा फास्टचा जप नाही गायचा हा आणि एवढचं वाटत असेल ना तर स्वतः ड्राइव करायचे, कळले. काय यार, त्यांनी लगेच परमीशन दिली असती तर आपण सुद्धा आता सगळ्यांसोबत महाबळेश्वरच्या  थंड हवेत रॉक ऑन
म्यूज़िक , डान्स........... मस्त पार्टी  करत असतो..............."

"हो ग. पण काय करू. सोड ना."

"ओके, अरे पण लेट झाला हे सुद्धा चांगलंच आहे. नाहीतर हे घनदाट जंगल आणि त्यातून जाणारा हा रस्ता, मस्त वारा आणि त्यावर सुसाट पळणारी आपली कार. क्या बात है. वॉट अं अमेज़िंग एक्सपीरियेन्स." रिया बोलत होती तरीही का माहित मला बेचैन वाटत होते. त्या धुंद करणाऱ्या संध्याकाळी, सुसाट ड्रायव्हिंगची मज्जा घेण्याऐवजी तिथून लवकरात लवकर महाबळेश्वरला कधी पोहोचतो असे झाले होते. रियाला तसे बोलले देखील..... पण ती काय, माझीच खेचत होती. मी उगाचच घाबरत होते की ती येणाऱ्या संकटाची चाहूल होती.

"मॅडम, का प्रत्येकवेळी एवढी सीरीयस  असतेस. एनजोय करायला केव्हा शिकणार ग तू, "  खरच रियाने माझ्या मनातील भीती लगेच ओळखली होती, आफ्टर ऑल शी इस माइ बेस्ट फ्रेंड. मी मात्र डोळे बंद करून तशीच पडून होते.



प्री...ती.., प्री...ती...   अचानक कानावर आदळणारे आवाज ऐकून दचकलेच. डोळे उघडले आणि डोळ्यांसोबत तोंडही उघडले गेले.  वूऊव....... वॉट अं अमेज़िंग व्यू ....... धिस इस अ रियल ब्यूटी..... आपसूकच उमटलेला  प्रतिसाद आणि सुरु झाला आमचा सेल्फिएस चा क्लिक्लिकाट. मनसोक्त फोटोशुट केल्यावर आमची स्वारी पुन्हा मार्गी लागली. कित्ती मस्त..... ना प्रोफेसरची बडबड, ना घरातली वटवट...... फक्त उनाड वारा आणि अप्रतिम निसर्ग..... असे वाटले हा प्रवास संपूच नये.   मनातील भीती काहीशी कमी झाली होती.



सरणाऱ्या दिवसाबरोबर अंधारही वाढू लागला तसे भीतीने पुन्हा डोके वर काढले. "रिया कधी पोहोचू ग आपण. काळोख बघ ना किती आहे. १० वाजत आले.  भूक सुद्धा लागली आहे आता."
"डोण्ट वरी प्रितु. वाईला पोहोचूच पाचेक मिनीटात, ते बघ वाई फक्त ५ किमी वर आहे आणि तो बघ बोर्ड.... हॉटेल सनशाईन. तिथेच एखादी रूम बघू, पेटपूजा करू आणि ताणून देऊ मस्त आणि सकाळी वी विल कंटिन्यू अवर जर्नी टू महाबळेश्वर..........  वॉट से."

"नाही" मी जवजवळ ओरडलेच. "आपण इथे कुठेही थांबायचे नाही. नो नीड तो हॉल्ट एनिवेर. वी विल ड्राइव स्ट्रेटली टू महाबळेश्वर. आता डाइरेक्ट्ली तिथेच जाऊन थांबू. मला इथे थांबणे योग्य वाटत नाहीये." माझे शब्द रियापर्यंत पोहोचेपर्यंत आमची गाडी हॉटेलच्या दिशेने वळली सुद्द्धा.  आता तिच्यासोबत आत जाणे भागच होते. गेट मधून आत शिरता शिरता कोणाची तरी चाहूल लागली. वळून पहिले तर कोणीच नाही. कदाचित भीतीमुळे भास होत असतील मला.
तितक्यात..... "भॉव...... हाहःहाहा....... कित्ती ग भित्री माझी मैत्रीण.......... हाहाहाहा "

"रिया..... काय ग हे.............. दचकले ना मी" वाढलेल्या श्वासांसोबत रियाच्या पाठीत एक बुक्का दिला.

"देर ईज़ नो वन बिहाइंड उस डार्लिंग. व्हय आर यू सो वरीड? . आपण पिकनिकला जात आहोत आणि तू अशी घाबरून काय मजा करणार आहेस.  आइ अम विथ यू. मग का आणि कोणत्या गोष्टीला इतकी घाबरतेस. काढून टाक मनातली भीती अँड जस्ट चिल आउट. ओके?" रियाने मला जवळ घेत समजावण्याचा प्रयत्न केला, नेहमीप्रमाणेच.  सो स्वीट ऑफ हेर. पण माझी भीती ह्यामुळे कमी नाही झाली.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

“नो मॅडम, एकही रूम अवेलबल नाहीये. वी आर सॉरी. वी कॅंट हेल्प यू.” – हॉटेल इनचार्ज .

“ प्लिज़ चेक वन्स अगेन." रिया

"मॅडम, जर रूम अव्हेलेबल असता, आइ वुड हॅव डेफनेट्ली अकॉमडेट यू. वाइ वुड ई कीप यू वेटिंग इफ एनी रूम इस वेकेंट.  वी आर सॉरी. वी कॅंट हेल्प यू.” बिच्चारा हॉटेल इनचार्ज. ह्या स्थितीतही मला त्याची कीव वाटली आणि हसूही येत होते. गेली १०-१५ मिनिटे तो रीयाशी हुज्जत घालत होता.

"ओके, नो इश्ूझ, आइ होप यू डोण्ट माइंड आम्ही इथे लॉबीत बसून राहिलो तर. राइट?" रियाने बॅग्स सोफ्यावर ठेवताना म्हटले. इनचार्जचे एक्स्प्रेशन्स पाहण्यालायक होते आणि मला मात्र हसू आवरत नव्हते (आइ विश मी इनचार्ज सोबत एक सेल्फ़ि काढला असता, लाईक्सचा रेकॉर्ड ब्रेक झाला असता.................. :) ).

“रिया लेट्स गो, तसेही इथे रूम अव्हेलेबल नाहीये. सो लेट्स नॉट वेस्ट टाइम न मूव.”

“ नमस्कार मॅडम". , लोकल वाटणारा एक माणूस हात जोडून आमच्याकडे पाहत उभा होता. " मी अजय म्हात्रे. मी एक लोकल ट्रॅवेल एजंट आणि गाईड आहे. हे माझे कार्ड. रोड-वे नावाची एक छोटी ट्रव्हेल एजन्सी आहे माझी."  आम्हाला बोलण्याची संधी न देता, कार्ड रियाच्या हातात ठेवत तो पुढे बोलत राहिला "मी मघापासून पाहतोय. इथे रात्र काढण्यासाठी रूम नाहीये. जर तुमची काही हरकत नसेल तर, इथे जवळच एक चांगले हॉटेल आहे. तुमच्यासाठी एकदम सोयीस्कर. तुम्ही बेफिकीरपणे राहू शकाल आणि रेट्स सुद्धा त्यामानाने खूपच कमी आहेत. चला मी दाखवतो तुम्हाला." आमच्या बॅग्स उचलता उचलता आमच्याकडे पाहून बोलत होता. मी काहीशा रागानेच पाहिल्यावर जरा वरमला असेल नसेल पण मला तसा भास मात्र झाला. "नाही म्हणजे तुमची काही हरकत नसेल तरच" अजूनही आमच्या बैग्स त्याच्या हातात होत्या. त्याची ती नजर, बोलण्याची लकब, ओवरॉल मला त्याच्यावर विश्वास ठेवावासे नाही वाटले.

कार्ड न वाचता फक्त हातात उलटे सुलटे फिरवून रियाने मला सोबत निघायला सांगितले. “रिया लिसन, लेट्स मूव फ्रॉम हियर” पण माझ्या बोलण्याकडे रियाचे लक्ष नव्हतेच. हॉटेल सनशाईन मधून आम्ही बाहेर पडलो. “रिया, इथून निघूया ना इथून आणि महाबळेश्वरला जाऊ. आइ अम नॉट कम्फार्टेबल हियर. प्लिज़ रिया. रिया लिसन टू मी” गाडीजवळ येत येत मी रियाला खेचले.

 “कम ओन् प्रीती, वाइ यू सो वरीड? . लुक वी नीड तो हॅव रेस्ट आणि त्यासाठी धिस लोकल गाइ गॉना हेल्प उस. हे बघ, आपण जाऊया त्याच्यासोबत, जर तुला त्याने दाखवलेले हॉटेल नाही आवडले तर  आपण इमिजिएटली निघू, आइ प्रोमीस. निदान जाऊन बघायला काय हरकत आहे. डोण्ट बे सो नेगेटिव." माझ्या गळ्यात हात टाकत रिया मला समजावत होती. "डोण्ट वरी डियर, मैं हु ना”. शाहरुख स्टायलमध्ये रियाला पाहून मला हसू आले आणि मला हसताना पाहून रियाला बरे वाटले.

अजय म्हात्रे, लोकल गाईड.
आमची गाडी त्याच्या सोबत हॉटेलच्या दिशेने पळत होती.

क्रमशः 
नमस्कार मंडळी...........

काय म्हणताय? कसे आहात? मज्जेत ना?

काय म्हणताय.... बऱ्याच दिवसात एकही पोस्ट नाही....... बऱ्याच ब्लॉग्स सारखा हा ब्लॉगसुद्धा एक-दोन पोस्ट नंतर बंद पडला की काय......

अहो नाही नाही.... असे काय करताय.......... ब्लॉग बंद करण्यासाठी नाही हो सुरू केला........
मान्य आहे थोडा उशीर झालाच.......... पण अहो जाम busy होते त्यामुळे जरा लिहिता आले नाही, पण आता तुमच्यासाठी आणत आहे एक नवी कथा..........

बघा बुवा कशी जमली आहे ती........ आता एक भाग प्रकाशित करत आहे........ पूर्ण कथा जुलै पर्यंत पूर्ण करण्याचा विचार आहे. बघू कसे जमतंय ते.............

मराठी..... भाषा आणि जात !!!!

खूप ऐकतो, खूप चर्चा करतो....... कुठे आहे मराठी भाषा...... कशी टिकणार आपली मायबोली.....
पण मराठी भाषा म्हणजे नक्की कोणती............. कारण इथेही मराठी भाषेपेक्षा जातीवर अवलंबून असणार्‍या मराठी भाषेवरून मराठी माणसांतच जुंपते.

पण त्यापलीकडे आपण काही करतो का????

बघायला छोटा पण खूप मोठा प्रश्न आहे हा..................

नाही नाही, इथे पुन्हा एकदा ह्या विषयावर चर्चा नाही करणार; तर एक किस्सा सांगणार आहे..... परवाच नकळत घडलेला...... पण पुन्हा ह्या विषयावरील विचारांत घेऊन जाणारा.


परवा काय झाले, तर शेजारचा एक छोटू घरी आला. छोटू म्हणजे शेजारी राहणारा एक लहान मुलगा... असेल दुसरी तिसरीत. कॉन्वें शाळेत शिकतो (मर्‍हाठी शाळा नाही बरे का). तर तो आपला गणिताची पुस्तके घेऊन आला (आला कसला तो.... अभ्यासासाठी कधीही येणार नाही तो. आईनेच पाठवले बिचार्‍याला)........तर मी त्याला गणिते समजावून सांगितली (म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न केला हो). तर हा बाबा आपला आनी-पानी निघाला. झाले मराठी बाणा खडबडून जागा झाला आणि गणिते राहिली बाजूला आणि मराठीची शाळा सुरु झाली.


मला हट्ट सोडवेना आणि त्याला ते काही जमेना..... (नवरा TV पेक्षा live drama enjoy करतोय....... हातात चहाचा कप आणि समोर  live drama ).


शेवटी वैतागून मी छोटुला बोललेच, काय रे तुझी भाषा अशी (पाठून नवर्‍याची commentary एव्हाना सुरु झाली होती..... "मै तुम्हारे भाषा के बरे मे बोल रही हू"). आणि छोटू बिचारा गोंधळलेल्या अवस्थेत. मी त्याला बोलले अरे बाबा मराठीच आहेस ना रे तू आणि भाषा बघ कशी . आता मात्र छोटूचे Expressions पाहण्यालायक होते. भाषा युद्ध जिंकल्याच्या अविर्भावात म्हणाला.... 'अहो काकी मी मराठी नाही आहे.... मी तर कोळी आहे" आणि नाचत नाचत घरी गेला.



दोन क्षण तर काही कळलेच नाही पण पाठून नवर्‍याचे  (छद्मी) हास्य मात्र ऐकू आले.

श्री गणेशा

!!!! श्री स्वामी समर्थ !!!!                                                                 !!!! श्री गणेशाय नमः !!!!

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

कसे काय चालू आहे? मजेत ना?
काय म्हणता? ओळखले नाही...... अहो मी.... काय विचारता? मी कोण?
अहो मी म्हणजे..... ह्या ब्लॉगची लेखिका

काय भारी शब्द आहे ना हा लेखिका..... आता लेखिका म्हटले तर लिखाण हे आलंच.
तर हा ब्लॉग लिहिण्यास कारण की........ काय बरं कारण आहे........

लिखाण आणि मी........... जरा विचित्रंच वाटतंय ना. ही जोडी काही जमत नाहीए बुवा.

मी लिहु शकते(????) हा विश्वास दिला आमच्या ह्यांनी....... सौ. स्वाती वैभव गुरव मधील श्री. वैभव गुरव ह्यांनी. "Swati, you should start writing.  अगं प्रयत्न तरी कर. चांगलं लिहू शकतेस."

शैक्षणिक आयुष्यात निबंध, पत्रलेखन ह्यांसारख्या प्रश्नांकडे .ढूंकुनही न बघणारी मी, आज चक्क स्वतःचा ब्लॉग सुरू करतेय........ मलाच आश्चर्य वाटतंय.

स्वामी आणि बाप्पा, Mummy & Pappa आहेतंच, पण तुमची साथ सुद्धा हवी आहे ह्या लिहीण्याच्या प्रयत्नात.

Pappppa............ Missing you a Lot.

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com IndiBlogger - The Largest Indian Blogger Community