तिचा सूड....... भाग 4 अंतिम

"Nothing is wrong darling" पाठून अचानक आवाज आला. ओळखीचा वाटला म्हणून मागे वळून पाहिले तर  यश हाताची घडी घालून रीयाकडे पाहत होता आणि सोबत राहुलही होता. त्या दोघांना बघून मला आश्चर्य वाटले. 
"अरे यश आणि राहुल तुम्ही इथे?" मी हळूच रियाला चिमटा काढत म्हटले.
"अजय, give me keys, फस्त." माझा हात झटकत रियाने चावीसाठी हात अजयपुढे  केला.
"एव्हढी कसली घाई आहे" म्हणत यशने रियाचा हात पकडला.
"you XXX…….. leave my hand" रिया स्वतःला सोडवण्याच्या प्रयत्न करत होती.
मला काहीच काळत नव्हते काय चालू आहे.
"काय चालू आहे हे सगळे. यश सोड तिला"
"थांब हा मी सांगतो तुला" राहुलने माझे हात पकडले.
"राहुल काय करतोयस हे, सोड" राहुल आणि यशचे हात आमच्या कंबरेभोवती आले होते.
मदतीच्या आशेने मी अजयकडे पाहिले.
“तुला अजूनही नाही कळले..... you are so simple" म्हणत राहुलने माझ्याभोवतीचे हात घट्ट केले. "अग आमच्याच सांगण्यावरून तर अजय तुम्हाला इथे घेऊन आला न. काय अजय"  अजयला टाळी देत यश बोलला.


थोड्या वेळाने जेव्हा जाग आली तेव्हा आम्ही हात पाय बांधलेल्या अवस्थेत होतो. कुठे आहोत काहीच काळात नव्हते, आजूबाजूला पहिले तर समोर तिघेही हातातले ग्लास नाचवत हवेत धूर सोडत होते आणि आम्ही एका पुल खाली होतो, कदाचित जंगलात खूप आत. तोंडावर बांधलेल्या पट्टीने आमचा ओरडण्याचा प्रयत्न अयशस्वी केला.

"डार्लिंग किती चुळबुळ करशील." यशने रियाच्या तोंडावरची पट्टी काढली आणि आणि रिया काही बोलण्याच्या आतच यशची बोटे रियाच्या गालावर उमटली.
 "लागले का? आठवले काही..... सो नोउ लेट्स हव द फन विथ थ्रिल जान".
उतरवल्या जाणाऱ्या  कपड्यांसोबतच आमची अगतिकता अश्रूंतून ओघळत होती.

"नाही.... नको..... प्लीज आम्हाला सोडा..... लेट अस गो..... प्लीज" आमचे ओरडणे, विव्हळणे..... आमचा आवाज त्यांच्या पर्यंत पोहोचतच नव्हता.  लाचार नजरेने आम्ही दयेची भिक मागत होतो, पण सुडाच्या भावनेत बुडालेल्या यशवर आणि त्याला मैत्रीच्या नावाखाली साथ देणाऱ्या वासनाधीन झालेल्या राहुलवर काहीच परिणाम होत नव्हता. अजयसुद्धा मिळालेल्या पैशांना जागत होता.
आमच्या अब्रूची लक्तरे तोडली जात होती.

"मज्जा आली न जान?" निर्वस्त्रावस्थेत पडलेल्या आम्हा दोघींकडे पाहून तिघेही चिअर्स करत होते.

"साहेब, कशी असते हि मजा. जरा बघू का. तोंडाला पाणी सुटलय बघा." नशेत चर्र झालेला अजय आपल्या ओठावरून जीभ फिरवत अघाशीपणे आम्हाला नजरेनेच खात होता.  
“हाहाहाहा …………….जा अजय जा…………जी ले अपनी जिंदगी…….” यशने बाटली अजयच्या पाठीवर थोपटत म्हटले.
“रानटी पाखरू नाय झेपणार बुवा आपल्याला. आपल्यासाठी साधी चिमणीच बरी." अजय माझी दिशेने येत होता. 
“अजय प्लीज...... नको....." माझे रडणे आणि रियाचे सोडवून घेण्याच्या प्रयत्नात हातपाय आपटून घेणे. राग, लाचारी, अस्वस्थता, अश्रू, अगतिकता, सारे काही तिच्या नजरेत होते. 
"लिव्ह हर..... यु बास्टर्ड  " रिया अजयवर ओरडली तसा राहुल रियावर तुटून पडला.
"डोन्ट गेट जेलेस डीअर. मी आहे न".



मध्यरात्र  उलटून गेली.
"अरे... हि तर पूर्ण थंड पडली आहे..... ए उठ, अजून मजा संपली नाही. उठ" माझ्या हाताला पकडून यश बोलला तसा अजय जवळ आला.
"साहेब, हि तर गेली." माझ्या गळ्याला दाबत अजय बोलला. 
"नाही......" रियाची किंचाळी आसमंतात घुमली.
"ओह शिट. ये तिचे तोंड आधी बंद कर. असे कसे झाले. अरे" राहुल अजयवर ओरडला. 
“u……..u killed her…. U basterd….. I wont leave you” रिया रडत होती.
“सॉरी  प्रीती. तू नाही बोलत असताना सुद्धा मी तुला इथे राहण्यासाठी फोर्स केला. मी... मी रीस्पोन्सिब्ल आहे तुझ्या ह्या सिचुएशनला. प्लीज मला माफ कर."
"यश, थिंक, आता काय करायचे, माझे तर डोकेच चालत नाहीये."
"मी सुद्धा तोच विचार करतोय"
"साहेब मी सुचवू का काही." अगदी थंड स्वरात अजय बोलला. "एवढ्या आत जंगलात कोणीच येत नाही. तेव्हा हिला इथेच पुरून टाकू, काय म्हणता"
"ह्म्म्म............ पण.............. ओके. तसेही विचार करायला वेळ नाही. पण हिचे काय करायचे" रीयाकडे बोट दाखवत यश म्हणाला. 
"ती तिच्या मैत्रिणीसोबत आली होती, तिच्यासोबतच जाईल" राहुल.
"डन. अजय सुरुवात कर".


"साहेब, झाले" अजयच्या हाकेबरोबर हातातले कॅन टाकत यश आणि राहुल आमच्याकडे आले.
यशने मला खड्ड्यात ढकलले आणि राहुल रियाचे पाय ओढत तिला खेचत होता. ओढले जाताना टोचणारे दगड, रियाच्या पाठ रक्तबंबाळ करत होते. रियाचे अश्रू तिच्या वेदनांची जाणीव करून देत होते.
यशने लाथेने रियाला ढकलले. रिया माझ्याबाजूला येउन पडली.

"हे घे. काम पूर्ण कर. पण एक लक्षात ठेव. इकडची गोष्ट तिकडे कळत कामा नये." यशने अजयच्या हातावर पैसे ठेवले
 "राहुल, आतापासून तू मला ओळखत नाहीस आणि मी तुला." बिअरचा शेवटचा घोट घेत यश म्हणाला.

----------------------------------------------------------------------------------------------------------

एका वर्षानंतर......................


घड्याळ साडेअकराची वेळ दर्शवित होते. विजांचा कडकडाट मुसळधार कोसळणाऱ्या पावसाला साथ देत होता. दिवे गेले असल्याने रात्रीच्या अंधारात अजूनच भर पडत होती.
  
डिंग डोंग... अचानक वाजलेल्या बेलने तो दचकून उठला.
"च्या आयला कोण कडमडतय ह्या पावसात, ते सुद्धा रात्री साडेअकरा वाजता." म्हणत तो दरवाज्यापर्यंत आला.
"कोण" दरवाजा उघडत त्याने विचारले. अंधार इतका होता ती काहीच दिसत नव्हते.
मोबाईलच्या प्रकाशात समोर उभ्या असलेल्या मुलीचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत त्याने पुन्हा विचारले "कोण? अहो बोला काहीतरी".
दूर उभ्या असलेल्या कारकडे बोट दाखवत ती उत्तरली "माझी गाडी बंद पडली आहे. त्यात रस्त्यावर  दिवेही नाहीयेत. कदाचित पावसामुळे असेल. एवढ्या पावसात काय करू कळत नव्हते.  समोर हे घर दिसले म्हणून मदतीच्या आशेने आले आणि विजेच्या उजेडात घरावर हि पाटी दिसली 'रोडवे'".

"हो हो. रोडवे. या न आत या. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आल्या आहात." तिच्या मंजुळ आवाजामुळे तिचा चेहरा पाहण्याची इच्छा आता तीव्र झाली होती.
"पाउस काही थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहेत.  आज तुम्ही इथेच थांबा. आतल्या रूम मध्ये माझे कपडे आहेत ते चेंज करून घ्या. संपूर्ण भिजला आहात. माझे चालतील ना, नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर" मिनी स्कर्टमधून दिसणाऱ्या तिच्या पायांकडे पाहत तो म्हणाला.
"हो हो चालेल.  अहो हरकत कसली, खूपच मदत करत आहात तुम्ही. तुमचे आभार कसे मानू कळतच नाही." तिने त्याचे हात हातात घेत म्हटले.
"अहो मदत कसली. तुमच्या सारख्या म्हणजे.... अडचणीत असलेल्यांना मदत करणे माझे कर्तव्यच नाही तर  माझे कामही आहे. रोडवे नावाची travel एजन्सी आहे ना माझी." आपल्या हातांभोवती असलेल्या तिच्या हातांकडे पाहत अजयचे मन काही वेगळाच विचार करत होते.
"हो..... रस्ता चुकवून मदत करणे तुमचे काम आहे ना"
"उम्म्म, काही म्हणालात का"
"नाही.... थंडी खूप वाजतेय ना, त्यात हे ओले कपडे" म्हणत तिने आपल्या शर्टचे वरचे बटन काढले.
"हो हो, मी देतो तुम्हाला माझे कपडे. तो पर्यंत तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करा. बरे वाटेल तुम्हाला. बाथरूम तिथे आहे."अजय अजूनही तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत होता.

थाड.......
अजय वळला तसा डोक्यावर झालेल्या प्रहराची जाणीव झाली आणि हळूहळू शुध्द हरपत गेली.
अजय शुद्धीवर आला, तशी त्याला ठणकणाऱ्या डोक्याची जाणीव झाली. हाताने डोके घट्ट पकडावेसे वाटले, पण हात उचलले जात नव्हते. खुर्चीवर बांधले गेलो असल्याचे त्याच्या लक्षात आले.

"तू..... नाही..... नाही..... तू.... तू क.... कशी......" रियाला  समोर पाहून अजयची बोबडी वळली. घाबरून उठण्याच्या प्रयत्नात तो खुर्चीसकट खाली पडला.
"अर्रे व्वा. ओळख अजूनही आहे. गुड. तू विसरला नाहीस. तुला आठवून देण्याची मेहनत वाचली माझी."
"प....ण.... तू.... क..... शी...."
"ये गप ये" हातातला ग्लास अजयच्या गालावर फोडत रिया म्हणाली "ऐक, आता जास्त आवाज नाही करायचा आणि चुपचाप यशला फोन करायचा. ओके".
आधीच भेदरलेल्या आणि त्यात आता गालावर झालेल्या वारामुळे प्रतिकार करण्याची ताकदच उरली नव्हती.
रियाने अजयच्या मोबाईलवरून यशला फोन केला आणि लाउडस्पीकर ऑन केला.
"हेल्लो...." पलीकडून आवाज आला.
"हे... हे... लो... हेल्लो" अजय थरथरत होता. "ये, नीट बोल" रियाने फोनवर हात ठेवत अजयच्या पोटात लाथ घातली तसा अजय कळवळला.
"हे... हेल्लो... हेल्लो यश"
"येस.... व्हूज धिस"
"यश, यश मी" पुन्हा एक लाथ कंबरेत बसली.
"यश....... मी अजय"
"अजय"........... चार क्षणांच्या शांततेनंतर यशचा आवाज आला "तू.... तू क फोन केलास. तूला सांगितले होते ना, फोन नाही करायचा."  यशच्या आवाजात राग आणि भीती झळकत होती. "आणि माझा हा नंबर तुला कुठून मिळाला".
"न... ना.... नाही... य....
"हे बघ अजय, मला काही बोलायचे नाही ना काही ऐकून घ्यायचे. मी फोन ठेवतोय."
"री... रिया....."
"का..... य.... री... रिया...." रियाचे नाव ऐकताच यशच्या हातातून फोन खाली पडला. स्वतःला सावरत फोने हातात घेत यश म्हणाला "रिया... व्हाट? कॅमोन अजय...... स्पीक अप....." पण फोन कट झाला होता.


"रिया प्लीज.... माफ कर.... माझी चूक झाली..... प्लीज रिया......" अजय दयेची भिक मागत होता.
"काय झाले अजय..... रानटी पाखरू झेपले नाही ना तुला" म्हणत रियाने अजयच्या खड्ड्यात माती टाकायला सुरुवात केली.



"हेल्लो..... राहुल............ राहुल........... यश बोलतोय"
"यश....... तू.......... से ब्रो............ हाऊ आर यु? आणि इतक्या रात्री फोन केलास. इज एव्हरीथिंग ऑलराइट"
"उद्या दुपारी २ वाजता माहीम स्टेशन बाहेर सी सी डी मध्ये भेट"
"अरे पण काय झाले? आणि आपण कधी भेटायचे नव्हते ना?
"आता काही बोलू नकोस. दुपारी भेटून बोलू".


"का....य..... हाऊज धिस पोसिबल?  तू एक काम कर, अजयला पुन्हा एकदा फोन कर. मला वाटते हि नीड्स सम मोअर मनी" राहुलचा विश्वास बसत नव्हता.
तुला काय वाटते, मी फोन केला नसेन. आतापर्यंत हजारवेळा फोने केला, पण त्याचा नंबर डज नॉट एक्जीस्त येतोय".
"अरे पण एक वर्ष झाले ह्या गोष्टीला. आता कशाला अजय तुला फोन करून तिचे नाव घेईल. नशेत चढली असेल त्याला."
"जर नशेत असेल, तरी एक प्रश्न राहतोच ना, कि त्याच्याकडे माझा हा नंबर कुठून आला. हा नंबर तर मी तिथून आल्यावर घेतला आणि तुझ्याकडे सुद्धा नव्हता. सगळे पुरावे आपण नष्ट केले. मग आता त्याने तिचे नाव घेऊन फोन कट का केला. जर पैसेच हवे होते तर पुन्हा फोन का नाही केला."
"ह्म्म्म्म.... राइट" राहुलसुद्धा विचारात पडला.
"आपल्याला तिथे जायला हवे. आजच निघू" कसलातरी तरी विचार करत यशने राहुलला निघण्याची तयारी करायला सांगितले.


Hotel Evening Snow
रात्रीचे साडेदहा अकरा वाजले असतील. कार पार्क करून यश तडक रिसेप्शनवर गेला.
"मी एका वर्षापूर्वी माझ्या काही मित्र-मैत्रिणींसोबत इथे आलो होतो. त्यातल्या दोन मुलींचे डीटेल्स मला हवे आहेत. २०.०४.२०१२ चा रेकॉर्ड चेच्क करून सांगा". यशने म्यानेजरला सांगितले.
"सर, विझिटर्सचे रेकॉर्ड्स कोन्फ़िडेन्शिअल असतात. सोरी. आम्ही ते तुम्हाला नाही दाखवू शकत."
"आय वौट टू सी इट." यश ओरडला.
"Sir pls understand. It is confidential आणि प्लीज तुम्ही शांत राहा”
"तुझ्या तर........" यशने एव्हाना कॉलर पकडली.
“Sir pls behave yourself and calm down” म्यानेजर स्वतःची कॉलर सोडवत म्हणाला.
“Yash… stop it, सोड त्याला. मारामारी करून काही मिळणार नाही." यशने रागाने स्वताची मुठ समोरच्या भिंतीवर आपटली.
"बी काल्म” म्हणत राहुलने खिशातून 500 ची एक नोट काढून म्यानेजर समोर धरली.
त्याने एकदा त्या नोतेकडे पहिले आणि लालसेने राहुलकडे पाहिले. राहुले अजून एक नोट काढली.

"सर, प्लीज लवकर चेक करा, कोणी पहिले तर माझी नोकरी धोक्यात येईल." त्याने एकदा चहुबाजूला पहिले आणि कोणी पाहत तर नाही ना याची खात्री करत ते रजिस्टर राहुलच्या हातात दिले.
यशने घाईघाईतच ते खेचून घेतले आणि पटापट पाने चाळू लागला.  

१६.०४.२०१२, १७.०४.२०१२, १८.०४.२०१२, १९.०४.२०१२, २१.०४.२०१२; यशने पुन्हा एकदा चेक केले. १६.०४.२०१२, १७.०४.२०१२, १८.०४.२०१२, १९.०४.२०१२, २१.०४.२०१२; यशने पुन्हा पुन्हा रजिस्टर चेक केले.
"हे काय आहे? १६.०४.२०१२, १७.०४.२०१२, १८.०४.२०१२, १९.०४.२०१२, २१.०४.२०१२. २० एप्रिलचा रेकॉर्ड कुठे आहे? २० तारखेचे पान कुठे आहे?" यशचा राग वाढला होता.
राहुललासुद्धा काहीच काळत नव्हते. त्याने म्यानेजार्कडे पाहिले आणि अजून एक नोट त्याच्या हातात कोंबली.
"२० तारखेचा रेकॉर्ड तर अजयने तेव्हाच फाडून टाकला होता. जवळ जवळ एक वर्ष झाले असेल. आता त्यालाच माहित ते पान कुठे आहे ते".
"अजयचा नंबर आहे तुमच्याकडे त्याला बोलवून घ्या. सांगा आम्ही आलो आहोत".
"सर त्याचा नंबर लागत नाहीये. मी गेले दोन दिवस त्याला हॉटेलच्या कामासाठी फोन करत होतो. आणि गेल्या दोन दिवसात कुठे दिसला सुद्धा नाही तो."


यश आणि राहुलने हताश होऊन सोफ्यावर येउन बसले. "सर, अजून काही हेल्प हवी असेल तर सांगा. We are happy to server you” म्यानेजारचा आवाज येत होता.

"यश...... जस्ट चिल. तू उगाचच panic  होत आहेस. उद्या सकाळी आपण अजयच्या घरी जाऊ. ओके" कॅन संपवत राहुल यशला समजावत होता. "चल, मी रूमवर जाऊन झोपतो. तू सुद्धा झोप आता".


‘I have got to know about it. Ajay told me about everything. We are waiting for you below that  bridge. Come soon, we are waiting’ राहुलच्या मोबाईलवर यशचा मेसेज आला.
बेडवर तळमळत असलेल्या राहुलने घड्याळात पाहिले. सव्वा बारा वाजले होते. मेसेज वाचून राहुलला जर बरे वाटले. "चल एक टेन्शन कमी झाले" तो लगेचच हॉटेलच्या बाहेर पडला.


“यश …………… अजय ………………Where are you guys………………….”
“य......श …………… अ......जय ………………राहुल पुलाखाली उभा राहून दोघांना शोधत होता. दुरदुरपर्यंत कोणाचा मागमूस नव्हता. शेवटी राहुलने यशला फोन केला.

"हेल्लो....." यशचा झोपेत असलेला आवाज आला.
“Yash where are you bro, I am waiting”
“You are waiting, for what…………..”
"यश.... आता मस्करी नको. ऑलरेडी डोके फुटण्याची वेळ आली आहे. आता लवकर सांग तू आणि अजय कुठे आहात?"
"राहुल.... अरे कसली मस्करी. आणि अजय तो कुठे भेटला?
"अजय अरे तुला भेटला न तो.... तुच मला मेसेज केला कि तुला अजयने सगळे सांगितले आणि तुम्ही दोघे माझी वाट पाहत आहात पुलाखाली".
"मी.... मी केला मेसेज? अरे झोप येत नव्हती म्हणून तुला फोने करून बोलावणार होतो पण माझा फोनच सापडत नव्हता. कुठे ठेवला ते आठवतच नव्हते. अंघोळ करून आल्यावर बघतो तर बेडवरच होता. एक मिनिट....पण तुला हा मेसेज...... म्हणजे......" यशच्या आवाज भीतीने थरथरत होता. 
राहुलच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि घामाने शरीर भिजून गेले.
"नाही.... काही नाही.... मी तुला फोन करतो" राहुलने फोन बंद केला. आपण कशाततरी अडकलो आहोत हे राहुलला समजले पण त्याला यशची भीती वाढवायची नव्हती आणि स्वतःला लवकरात लवकर त्यातून सोडवायचे होते. तिथून निघण्यासाठी तो वळला आणि...... थाड.... थाड.... त्याच्या डोक्यावर काहीतरी जड वस्तू आपटली.

शुद्ध आली तेव्हा राहुलचे हात बाधलेले होते आणि पाय गाडीच्या दिक्कीला बाधलेले होते. आणि समोर दिक्कीवर बसून रिया बिअर पीत होती.

“Hieeee…. Rahul………. How are you baby” रियाने राहुलकडे प्रेमाने पाहत विचारले.
"र... री... या.... रिया.... तू? राहुलने विचारले.
“येस डार्लिंग. द फन इज येट टू गेट कॅम्प्लीटेड" म्हणत रियाने राहुलच्या तोंडात बिअरची बाटली उलटी धरली. श्वास न घेत आल्यामुळे राहुलची तळमळ वाढत होती.       
"काय झाले राहूल? त्रास होतोय? मी आणि प्रीतीसुद्धा अशाच पाहत होतो तुमच्याकडे हेल्पलेस होऊन. तुला आठवतंय राहुल, टू मला खेचत घेऊन जात होतास. माझ्या पाठीला दगड, काटे टोचत होते. मी ओरडत होते पण तुला मात्र खूप मज्जा येत होती न. चल तर तीच मज्जा आता पुन्हा घेउया." म्हणत रिया गाडीत बसली आणि गाडी सुरु केली.

३०,,,,४०,,,,५०,,,,६०,,,,७०,,,,८०,,,,९०,,,,,१०० वाढणाऱ्या गाडीच्या स्पीडसोबतच सरपटल्या जाणाऱ्या राहुलच्या वेदनेचा आवाजही वाढत होता.
मला मात्र राहुलच्या पाठीतून निघणारे रक्त पाहून आणि त्याच्या किंकाळ्या ऐकून आनंद होत होता.

अर्ध्या तासानंतर गाडी थांबली आणि राहुलचे श्वासही.


हॉटेलमध्ये येरझारा घालत यशला काहीच काळात नव्हते. त्याने तर कोणताही मेसेज केला नव्हता मग राहुल असे काय बोलत होता आणि त्याचा सुद्धा फोन लागत नव्हता. कदाचित आपण जर जास्तच विचार करतोय आणि राहुलही नशेत बोलला असेल. आणि तसेही जर राहुल पुलाखाली गेला असता... तर म्यानेजारच्या म्हणण्याप्रमाणे गेट मधून बाहेर जाताना त्याने कोणालाही पहिले नव्हते. यश पुन्हा झोपायला गेला. 

दोन अडीच वाजले असतील. यशचा मोबाईल ब्लिंक झाला. झोपेच्या प्रयत्नात असलेल्या यशने लगेच मोबाईल घेतला. राहुलचा whatsapp msg आला होता. राहुलेने कसलीतरी इमेज पाठवली होती.  
इमेज डाऊनलोड होईपर्यंत यशसुद्धा राहुलचा मेसेज पाहून relax  झाला होता. तेव्हढ्यात डाऊनलोड झालेली इमेज पाहून यशच्या तोंडचे पाणी पळाले. 

रक्ताळलेल्या राहुलचा फोटो आणि त्याखाली लाल अक्षरात लिहिले होते, 'Now its your turn my jaaaan. Be ready.’ यशने मोबाईल दूर फेकला. त्याचे संपूर्ण शरीर कांपत होते. 


काही वेळातच यशची कार फुल स्पीडने रस्त्याला लागली होती. यश बराच पुढे निघून आला होता. पाठी एकदा वळून त्याने पहिले. मोकळ्या रस्त्याशिवाय काहीच नजरेस पडत नव्हते. ते पाहून त्याला जर हायसे वाटले. तेवढ्यात एक सफारी खूप स्पीडने जवळ येत होती.

काही कळायच्या आतच १.... २.... ३.... ४.... यशच्या कारला सफरीची धडक बसत होती. यशचे त्याच्या कारवरचे नियंत्रण सुटले आणि कार एका झाडावर जाऊन आपटली.

रियाने खेचतच यशला बाहेर काढले. यशच्या डोक्याला मार लागला होता पण शुद्ध मात्र होती.
“Hi my sweetheart. ओळखले नाही का तुझ्या जानुला ” यशच्या पोटात लाथ घालत रियाने विचारले तसा यश कळवळला. भीती, आश्चर्य, राग, वेदना त्याच्या नजरेत उमटत होती आणि शरीर कापत होते.

"Jaaaan………….. दुखतंय का जास्त. Don’t worry I will take full care of yours.” रियाने यशचे हात पाय बांधायला सुरुवात केली. डोक्याला लागलेला मार आणि समोर रिया, यशमध्ये  प्रतिकार करण्याची ताकद नव्हती. 

"खिशातून चाकू बाहेर काढून तो यशच्या गालांवरून फिरवत रियाने विचारले, “Want to have thrilling fun baby? Lets go then n have a blast my jaaan”.

चाकूचे टोक यशच्या दोन भुवयामध्ये होते. तिथून हळूहळू उजव्या गालावरून खाली ओठावर आणि मग हनुवटीवर आले, पण सोबत आपल्या वाराचे निशाण ठेवूनच.
"आआई............." यशच्या किंकाळी शांततेत उमटली, जेव्हा त्याच्या छातीवर सुधा वर झाला. 



चिरफाड झालेले शरीर , त्यातून ओघळणारे रक्त आणि वेदनेने भरलेले यशचे विव्हळणे..... "रिया... प्लीज.... प्लीज मला माफ कर.............. माझ्याकडून चूक झाली..... रिया........."

 "प्लीज, स्तोप, माफी, सोरी.... हे शब्द तुझ्या ओठी शोभत नाहीत यश. रिव्हेंज, बदल, सूड, हे शब्द तुला जास्त सूट होतात." यशच्या शरीरावर चाकुची नक्षी उमटत होती.
"यश................" यशच्या बोटांवर माझा पाय ठेवत यशला हक मारली.
"प्र.... प्र... प्र....प्रीती........" 

रियाने मोबाईल बाहेर काढला. एकच क्षण......... आमच्या सेल्फिजचा क्लीक्लिकाट नजरेसमोर तरळून गेला. चेहऱ्यावर एक हलकेसे हसू आले, पण यशच्या विव्हाल्ण्याने त्याची जागा पुन्हा संतापाने घेतली. 

क्लिक.... उजेडाने यशचे डोळे दिपले. रियाने यशचे गाल हाताने पकडले, त्याबरोबर तो अजूनच कळवळला. रियाने मोबाईल त्याच्या समोर धरला आणि त्याला नुकताच काढलेला फोटो दाखवला. फोटो पाहून यशचे तोंड उघडेच राहिले.

‘REVENGE’ त्याच्या छातीवर कोरलेली हि ती अक्षरे.

“Revenge…………. हाच शब्द जो तू मला लक्षात ठेवायला सांगितला होतास आणि त्या एकाच शब्दासाठी आम्ही दोघी परत आलो.”

सप.....सप.....सप.....सप..... माझ्या हातातील चाबूक चालतच होता... आणि यश............ जीवाच्या आकांताने ओरडत होता................ पण यशला मी एव्हढ्या सहजासहजी मरू देणार नव्हते. 

रियाने यशकडे पहिले. त्याच्या डोळ्यातील भीती, असहाय्यपणा, लाचारीपणाचे भाव पाहून रिया मनोमन सुखावली.      

“Jaaanu……. Hope you are enjoying…….. मज्जा तर येते आहे न तुला.”
त्याने माफीच्या भावनेने एकदा तिच्याकडे व एकदा माझ्याकडे पाहिले. त्याला होणाऱ्या यातना माझा आनंद वाढवत होत्या.

“ये उठ ये झोपू नकोस” त्याची हरपली जाणारी शुद्ध पाहून रियाने त्याच्या तोंडावर पाणी मारले. 
यशच्या तोंडून आवाज फुटत नव्हता. 

पहाट होत होती. आजूबाजूला दाट झाडी आणि समोर तेवढेच दाट तलाव होते.
समोरील ते दृश्य पाहून एक क्षण यश देखील आपल्या वेदना विसरला.

"तो तलाव दिसतोय यश........... तोच तलाव जो तू मला दाखवला होता.... पाण्यापेक्षा मगरीच जास्त असलेला तो तलाव. अश्या ह्या तलावात पोहोणे म्हणजे रिअल थ्रिल".

“N…oooo……..nooooo……… plea…….se” 

त्याच्याकडे लक्ष न देत मी त्याला त्या पाण्यात ढकलले.

नवीन पहाट  झाली होती. आकाशात आणि पाण्यात एकाचवेळी लाल रंग उमटायला सुरुवात झाली.

मी धावत जाऊन रियाला मिठी मारली. 

उजळणाऱ्या आसमंताने  आमचे चेहरे सुद्धा उजळून निघाले.
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com IndiBlogger - The Largest Indian Blogger Community