तिचा सूड....... भाग 3

तिचा सूड....... भाग 3

"Friends?" रियाने मैत्रीचा हात पुढे केला.
"ओह why not. अशा सुंदर आणि बिनधास्त मुलीची मैत्री कोणाला आवडणार नाही" यशने रियाचा हात आपल्या हातात घेतला.
रिया मंद हसली.

काही वेळ झाला असेल नसेल........... अचानक यशने रियाला जवळ खेचले. डावा हात तिच्या कंबरेभोवती घालून उजव्या हाताने त्याने तिची हनुवटी वर उचलली. काही कळायच्या आतच तिच्या ओठांवर त्याने ओठ टेकवले. 

“What is this Yash” यशला दूर ढकलत  रिया त्याच्यावर ओरडली. आश्चर्य आणि राग ह्यांचे मिश्र भाव रियाच्या चेहऱ्यावर उमटले होते. 

“What……….. have I done anything wrong?” यशने हसत रीयाकडे पाहिले.

“Wrong?” 

“Oh, Come on Riya…. Its fun…. Isn’t it?” यशने रियल जवळ ओढण्याचा प्रयत्न केला
 "म्हणूनच तर आपण दोघेच इथे आलो ना. तूच बोलली होतीस, let’s go and have a thrilling fun. मग आता का असे करतेस?”

“Enjoy???”रियाने त्याचे आपल्याभोवती असलेले हात झटकत म्हटले 
“Thrilling fun  आणि हे असे??? Are you out of your mind? मी तुझ्यासोबत इथे आले, आपण एकत्र ड्रिंक्स घेतले,  that doesn’t mean कि तू मला किस करशील. मी तुला मित्र समजून इथे आले आणि तू............ शी..............”

“friends….. रात्री साडेतीन चार वाजता एक मुलगी एका मुलासोबत जंगलात येते आणि त्याला फक्त फ्रेंड बोलते?" फ्रेंड शब्दावर जोर देत यशने रियाला पुन्हा एकदा मिठीत घेतले. "और वैसेभी एक लडका और एक लडकी सिर्फ दोस्त नही हो सकते."

"Leave me Yash"

"Come on Riya, okay okay.......... फ्रेंड्स तर फ्रेंड्स. पण मी तुला इथे घेऊन आलो तर निदान मला त्याचे बक्षीस तरी मिळायला हवे ना." असे म्हणत त्याने पुन्हा एकदा रियाच्या ओठांवर आपले ओठ टेकवत म्हटले.

थाड…….. “Be in your limit” यशच्या गालावर रियाची बोटे उमटली.

गाल चोळता चोळता यशने रागाने रीयाकडे पहिले “I won’t leave you Riya. You will have to pay for it. just remember this.......... REVENGE” पाठमोर्या जाणाऱ्या रीयाकडे पाहत यश ओरडत होता.
----------------------------------------------------------------------------------------------------------


“गुड मोर्निंग रिया, कसे वाटतंय आता?" झोपेतून उठलेल्या  रियाला मी विचारले. 

"वेरी गुड मोर्निंग डियर" डोळे चोळत रियाने स्माईल करत म्हटले.

"का ग? सकाळी सकाळी का एवढ्या चिंतेत आहेस?"

"सकाळ? मादाम आता ना सकाळ आहे ना दुपार. संध्याकाळचे सात वाजले आहेत."

"What????" रिया बेडवरच उडाली.

"हो आणि म्हणूनच माझ्या चेहऱ्यावर जी काळजी दिसतेय न ती त्यामुळेच आहे. अगं सकाळी उठले, सकाळ कसली दुपार झाली होती. १२ वाजले असतील मी उठले तेव्हा. तर.... तू आजूबाजूला कुठेच दिसली नाहीस. मला वाटले लवकर उठून पूलमध्ये असशील म्हणून तिथे गेले तर तू तिथेही नव्हतीस. मग शेवटी रूमवर आले तर तुम्ही एकदम गाढ झोपला होता आणि झोपेतच काहीतरी बरळत होतीस. तुला उठवण्याचा प्रयत्न केला तर तू कसली उठतेयस. तुझा तो झोपेतच रागावलेला चेहरा बघून सोल्लिड घाबरले मी. मग वाटले कि कदाचित स्वप्न पाहत असशील कसले तरी आणि कालच्या हेक्टिक ड्राइव्हिंग मुळे दमली असशील मग तुला तसेच झोपू दिले आणि मी आवरून खाली गेले. रिसेप्शनवर चौकशी केली तर कळले कि राहुल आणि यश सकाळीच निघून गेले."

मी बोलण्यात अशी गुंतले होते कि यशने नाव ऐकताच क्षणी रियाच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव मला कळलेच नाहीत. मी पुढे बोलतच राहिले "मग पुन्हा वर येउन तुला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. तू उठली नाहीसच मग कसा वेळ काढला ते माझे मला ठाऊक. पिकनिकला जातोय न आपण आणि इतका वेळ झोपायचे?" माझी बडबड चालूच होती.

"यश गेला!!! ...........................हुःश".

"ओह्हो, कोणीतरी कोणालातरी खूप मिस करतय."

"का.... काय"

"हेच की, यशची आठवण येतेय? लैला को मिलनेसे पह्लेही मजनू चल गया."

 "Shut up प्रीती, सकाळी सकाळी डोके फिरवू नकोस." मला मधेच तोडत रिया म्हणाली.

"ओह, इतका राग येतोय, कोणीतरी न सांगता गेले म्हणून. मग उठायचे होते ना आणि थांबवायचे होते त्याला"

“Priti, stop this nonsense and just shut up, okay?” माझ्यावर रागवत रिया म्हणाली.

“Okay, okay, just chill, I am just I am just kidding yaar". एव्हढी का हाइपर  होतेस?"

रियाने पुन्हा त्रासिक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिले.

"ओके, नाही चिडवणार. लिव्ह इट. मला सांग, आर यु ओके नाउ?" रियाला शांत करण्यासाठी विषय बदलत मी विचारले. 

"येस्स. मला काय झाले आहे?"

"काही नाही ग, तुझी काळजी वाटत होती. आज खूपच उशिरा उठलीस, तसेही तू उशीरच उठतेस...... पण आज झोपेत काहीतरी बडबडत होतीस म्हणून विचारले. वाईट स्वप्न पडले का?"

"अं, हो........... हो, वाईट.......  खूप वाईट स्वप्न...... स्वप्नच होते ते." रिया स्वतःशीच पुटपुटली.

"काय... काही म्हणालीस का?"

"नाही.... कुठे काय"

"जाऊदे कालची रात्र मस्त होती न "

"मी अंघोळ करून येते. जेवून लगेच निघू आपण" माझे बोलणे न ऐकताच रिया म्हणाली " बैग्स पैक कर" आणि थाड.... बाथरूमचा दरवाजा बंद झाला.

----------------------------------------------------------------------------------------------------------

"चल मादाम. मी तयार आहे" रीसेप्शनवर बिलिंग होता होता पाठून आवाज आला.

“Oh yeah, lets go”रियाने अजयकडे पाहत म्हटले.

“It was our pleasure to serve you. Have a pleasant and safe journey Madam” आपल्या स्मित हास्याने मेनेजरने आमचा निरोप घेत आमच्या पुढच्या प्रवासासाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या.

“Thank you” आणि आम्ही निघालो.

"रिया, काल धमाल मज्जा आली न. मी उगाचच घाबरत होते आणि उगाचच ह्या अजयवर संशय घेत होते. यु आर राइट. मी घाबरणे सोडून आनंदी राहायला शिकले पाहिजे. Thank you so much, तुझ्यामुळे मी काल खूप एन्जोय करू शकले. 

“You enjoyed na, that’s great” माझा हात पकडत रिया म्हणाली.

"मादाम, मी गाडी चालवू का? नाही म्हणजे रस्ता तितकासा चांगला नाहीये आणि मला शोर्टकट माहिती आहे, म्हणून विचारतोय. तसेहि काल गाडी चालवून तुम्ही दमला असाल ना. आरामशीर मागे बस. मी चालवतो." गाडीजवळ येता येता अजय म्हणाला.

"अरे व्वा, चालेल" म्हणत रियाने चावी अजयला दिली. 


"छान चालवतोस गाडी" कार वेगाने पळत होती.

"लोकांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवण्याचेच तर पैसे मिळतात न मला"

"अं..... काय"

"नाही, म्हटले ट्रव्हेल एजंट आहे न मी, गाडी व्यवस्थित चालवून लोकांना सुरक्षित पोहोचवणे माझे कामच आहे ना" म्हणत अजयने गाडी एका छोट्याशा वळणाकडे घेतली. "हा शोर्टकट आहे".

गाडीच्या हेडलाइटस मध्ये दिसणाऱ्या रस्त्याशिवाय बाकी काहीच दिसत नव्हते. रात्रीच्या त्या दाट काळोखात आजूबाजूची घनदाट झाडी अजूनच भर घालत होती.  जंगलातला तो रस्ता देखील चांगला नव्हता पण अजय गाडी सफाईदारपणे चालवत होता. 


दहा साडेदहा वाजले असतील. कर्र्र..... कर्र्र...... अचानक ब्रेक्स लागले आणि आमचे डोके पुढच्या सीटवर आपटून कार थांबली.

"काय झाले?" आम्ही विचारेपर्यंत अजय खाली उतरला होता. "काही प्रोब्लेम झाला आहे का" रियाने खाली उतरत विचारले. अजय काहीही उत्तर न देता आमच्याकडे पाहत उभा होता.चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते.

"अजय, What's wrong" अजयजवळ जात रियाने पुन्हा विचारले. 

"Nothing is wrong darling" पाठून अचानक आवाज आला.
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com IndiBlogger - The Largest Indian Blogger Community