तिचा सूड....... भाग २

हॉटेल इव्हनिंग स्नो..... हॉटेल तसं चांगलं होतं. मोठ्ठी लॉबी, मस्त गार्डन, इंस्त्रुमेंटल म्युजिक, आणि दरवळणारा मंद सुवास, I guess मोगरा असावा.

"Welcome to Hotel Evening Snow Madam and here is your key to Room No. 213. Your luggage will be sent to your room. Enjoy your stay. रमेश मादामना त्यांची रूम दाखव आणि  सामान त्यांच्या रूम मध्ये नेउन ठेव". हॉटेल मैनेजर अगदी अदबीने बोलत होता.

"बाहेर कसली गर आहे पण इथे बघ."
"हो रे..."
"वाळवंटात एकदम गार्डन वाटतंय......"

"गरमी" म्हणत रिया काउंटरवर आलेल्या दोन टपोरी दिसणाऱ्या मुलांकडे वळली तितक्यात "Hey darling, you done with the formalities, Lets move to our room then" रियाच्या गळ्यात हात टाकत यशने तिला स्वतःजवळ ओढले.
"Hey, leave me." रिया स्वतःला सोडवण्याच्या प्रयत्नात होती.
"नको न रागावू जान. I am sholly na baby." असे म्हणत यशने हॉटेल मैनेजरकडे असे पाहिले आणि तोदेखील असा हसला जसे कि रिया आणि यशचे भांडण झाले आहे आणि यश तीला मनवत आहे.

"काय मित्रा, तुला वाळवंटात गार्डन दिसतंय" रियाच्या कंबरेभोवती हात टाकत यशने त्या दोन टपोरी मुलांकडे पाहिले आणि राहुल, यशचा मित्रदेखील त्यांच्याकडे वळला, तसे दोघेही हॉटेल बाहेर पळून गेले.

"काय  फालतुगिरी चालवली आहेस. कोण आहेस तू. and how dare you to hug me and hold me like this?" रिया स्वतःला सोडवत कडकडली. तसे यशने तिला दूर केले "Thanks बोलायचे सोडून तू माझ्यावरच काय ओरडतेयस".

"Thanks...........!!!! huh...... my foot" रियाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसून येत होता.

"Hey listen, they were trying to......... forget.............. I just tried to help you and you......
Anyway Hi I am Yash....." यशने हात पुढे करत म्हटले. रिया त्याच्याकडे रागाने पाहत मला खेचत लिफ्ट कडे घेऊन गेली.

गरम पाण्याचे फवारे घेतल्यावर थकवा कुठल्या कुठे पळून गेला. 
"काय मग..... राहूया ना आपण इथे" टोवेल माझ्यावर फेकत रिया हसत होती.
"उम्म्म्म..... ठीक आहे, काढू शकतो आजची रात्र आपण इथे. तुमच्या साठी काय पण" उपकार केल्याच्या आविर्भावात मी बोलले आणि ऊशी माझ्या चेहऱ्यावर येउन पडली. मग काय ऊशी मारामारी ऐन रंगत आलेली आणि guitar चे सूर कानी आले. लगेच आम्ही पडदे बाजूला करून खिडकीतून खाली पाहिले. मुलामुलींचा एक ग्रुप firecamp जवळ एन्जोय करत होता. एक मुलगा हातात Guitar घेऊन तल्लीन होऊन गात होता. आम्ही एकमेकींकडे पाहिले, आमची नेहमीची स्माईल हसलो आणि दोघीही तडक खाली गेलो.

हॉटेलच्या मागे गार्डनमध्ये, आमच्यासारखेच ते सगळे, पिकनिकला आले असतील बहुधा.
मधोमध पेटवलेली शेकोटी हवेतल्या गारव्यात थोडा उबदारपणा आणत होती.  त्या धुंद वातावरणात भर टाकणारे आणि कान तृप्त करणारे गिटारचे सूर, थेट हृदयात हळूच शिरणारे  ते गाणे आणि ह्या धुंद, नशेल्या रात्रीला अजूनच मदमस्त करणारा त्याचा आवाज.................
“Dooba dooba rehta hoon aankhon me teri
Deewana ban gaya hoon main chaahat me 'तेरी
heeyyyyy 
Dooba dooba rehtaaaa hoon aankhon me teri
Deewana ban gaya hoon main chaahat me teri………….” 

अहाहा ................ क्या बात....... क्या बात.............. क्या बात......... क्या बात.........

एवढ्या सुरेल आवाजाचा चेहरा कसा असेल !!! दोघींनीही (अर्थपूर्ण) डोळे मिचकावले. पण पाठमोरे असल्याने त्याचा चेहरा दिसत नव्हता. वोडकाचा एक घोट घेऊन दोघी त्याच्या समोर येउन बसलो, त्याला पाहण्याची उत्सुकता वाढली होती आणि..........

 “यश!!!!" दोघीही किंचाळलोच. दुधात मिठाचा खडा टाकावे तसे त्या सुरेल मैफिलीत आमचा आवाज होता. परग्रहावरून आलेल्या एलियनकडे जसे पाहावे तसे सगळे आमच्याकडे पाहत होते. आणि यश...........तो मात्र  आनंद, आश्चर्य अशा मिश्र भावनांनी आमच्याकडे पाहत होता. त्याने मला एक स्माईल दिली आणि रीयाकडे पाहून उजवा डोळा मिचकावला.

"Gulabi Aankhe jo teri dekhi, sharabi ye dil ho gaya,
Sambhalo mujhko … o mere yaron
Sambhalna mushkil ho gaya..........." गिटारने नवा सूर पकडला आणि नजर रियावर.

राहुल हातात बियरचे ३ कॅन्स घेऊन आमच्या बाजूला येउन बसला.
म्युजीकवर डोलत एव्हाना आम्ही त्या ग्रुप मधलेच एक होऊन गेलो होतो. बहरणारी रात्र धुंदी वाढवत होती.  लॉनवरच केव्हा झोपी गेलो ते आम्हालाच कळले नाही. 


"Hi, तू जागी आहेस अजून? सगळे तर केव्हाच झोपलेत" यशने विचारले.
"नाही, मला झोप नाही आली अजून." 
"ड्रिंक्स?" हातातले एक कॅन पुढे करत यश ने विचारले.
"शुअर" रियाने कॅन घेत म्हटले.
"सो.... कसे वाटले गाणे"
"ती गाणी नेहमीच छान वाटतात....."
"Smart.......... I am asking about me"
"About you.......... What"
"माझा आवाज?"
"ओह........... ठीकठाक गातोस.............. OK types"
"Oh reallly........... Thank you Miss....." यश प्रश्नार्थक चेहऱ्याने रीयाकडे पाहत होता.
"मिस. रिया.......... रिया प्रधान. बाय द वे डिरेक्ट्ली नाव विचारले असतेस तरी मी सांगितले असते" रिया एक घोट घेत यशला म्हणाली.
“Bold and beautiful name as bold and beautiful as you. By the way thank you so much for your compliment. ”
“Excuse me…… मी तुला काही कॉम्प्लिमेंट  दिली नाही. तू ठीकठाक गातोस असे बोलले मी, चांगले गातोस असे नाही"
“That’s what dear, तुझी हि कॉम्प्लिमेंट म्हणजेच मी खूप छान गातो"
“Ohhhh yeahhh………….” आणि दोघेही हसू लागले.
"तू नाही झोपलास"
"तुझ्यासोबत जागा आहे"
“Flirting haaaan. don’t try the tricks on me. its not gonnna work”
“Flirting???? खरे बोलण्याला तू Flirting म्हणतेस तर मग.......... yups.....  I am flirting" यशने डोळा मिचकावला.
"हम्म्म्म्म"
"ड्राइविंगने दमली नाहीयेस, तुझी फ्रेंड तर केव्हाच झोपली”
"I am not like typical chuhi-muhi girl आणि तसेही नवीन ठिकाणी आल्यावर झोपेत वेळ घालवणे मला नाही आवडत. त्यापेक्षा I was just thinking to roam in a jungle behind…………." 
"आत्ता? एकटी?" रियाला मधेच तोडत यशने विचारले. 
"So what........"
"You really wanna so?" उभा राहत यशने विचारले. "Lets go then, कम विथ मी" रियाला उठण्यासाठी हात पुढे करत यश बोलला.
"You serious??? Okay...... lets go and have a thrilling fun" रिया यशचा हात पकडत उठत म्हणाली. 

गप्पा मारत, धडपडत, सावरण्यासाठी एकमेकांचा हात पकडत एव्हाना दोघे जंगलाच्या मध्यापर्यंत आले असतील.

"Wooow............. feeling amazing yaaar. खूप मस्त वाटतंय. हॉटेलच्या बोअरिंग  रूम मध्ये झोपण्यापेक्षा जंगलातल्या रात्री चांदण्यांच्या प्रकाशात बोचऱ्या  थंडीच्या साथीने चालण्यातली मजा काही औरच." रिया उत्साहाने बोलत होती. चालून चालून दमल्याने दोघेही काही क्षण थांबले होते. 

यशने आपल्या बॅगमधून  2 कॅन्स बाहेर काढले. एक रियाला देत स्वतःसाठी एक घेतला.

"Friends?" रियाने मैत्रीचा हात पुढे केला.
"ओह why not. अशा सुंदर आणि बिनधास्त मुलीची मैत्री कोणाला आवडणार नाही" यशने रियाचा हात आपल्या हातात घेतला.
रिया मंद हसली.

काही वेळ झाला असेल नसेल........... अचानक

1 टिप्पणी:

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com IndiBlogger - The Largest Indian Blogger Community